शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PPF calculator: दर महिन्याला 1000 रुपये गुंतविल्यास मिळतील 12 लाख; सरकारची सुरक्षित योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 7:04 PM

1 / 8
जर तुम्ही एखाद्या चांगल्या गुंतवणुकीच्या शोधात आहात, आणि कोणत्याही प्रकारची रिस्कही नको असेल तर तुमच्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) एक चांगला पर्याय ठरू शकतो. PPF मध्ये गुंतवणूक करण्यामध्ये रिस्क अजिबात नाहीय. याला पूर्णपणे सरकारचे संरक्षण मिळालेले आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला फायदाही मिळू शकतो. फक्त तुम्हाला विचारपूर्वक गुंतवणूक करावी लागेल. (PPF calculation)
2 / 8
दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करताना पीपीएफमध्ये चांगला परतावा मिळू शकतो. केवळ महिन्याला 1000 रुपये गुंतवून तुम्ही त्याचे 12 लाख रुपयांहून अधिक मिळवू शकता. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत पीपीएफ अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजदरात बदल करते. सरासरी हा व्याजदर 7 ते 8 टक्के राहतो. त्या काळातील आर्थिक परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला जातो. हा दर कमी अधिक होऊ शकतो.
3 / 8
सध्याच्या काळात पीपीएफवर 7.1 टक्के व्याज दर दिला जातो. हे वार्षिकदृष्ट्या चक्रवाढ व्याज होते. तसेच अनेक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त आहे.
4 / 8
पीपीएफ अकाऊंटमध्ये तुम्ही कमीतकमी 500 ते जास्तीतजास्त 1.5 लाख रुपये दर वर्षी गुंतवू शकता. याचा मॅच्युरिटी पिरिएड हा 15 वर्षांचा असतो. यानंतर तुम्ही हे पैसे काढू शकता. किंवा दर ५ वर्षांसाठी वाढवूही शकता.
5 / 8
जर तुम्ही पीपीएफमध्ये दर महिन्याला 1000 रुपये जमा केले तर 15 वर्षांत ही रक्कम 1.80 लाख रुपये होते. यावर 1.45 लाख रुपये व्याज होते. म्हणजेच मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 3.25 लाख रुपये मिळतात.
6 / 8
जर तुम्ही ५ वर्षांची मुदत आणखी वाढविली आणि 1000 रुपये भरतच राहिला तर एकूण गुंतवणूक ही 2.40 लाख होईल आणि त्यावर तुम्हाला 2.92 लाख रुपयांचे व्याज मिळेल. यानुसार मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 5.32 लाख रुपये मिळतील.
7 / 8
जर तुम्ही 15 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर जर पुढील पंधरा वर्षांसाठी मुदत वाढविली तर एकूण गुंतवणूक ही 3.60 लाख रुपये होईल. तसेच तुम्हाला यावर 8.76 लाख रुपयांचे व्याज मिळेल. याप्रकारे 30 वर्षांनंतर तुम्हाला याचे 12.36 लाख रुपये मिळतील.
8 / 8
जर तुम्ही पीपीएपमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यावर तुम्हाला कर्ज घेण्याची सुविधादेखील दिली जाते. मात्र, याचा फायदा तुम्हाला अकाऊंट उघडल्याच्या तिसऱ्या किंवा सहाव्या वर्षी मिळणार आहे. पीपीएफ अकाऊंटला सहा वर्षे पूर्ण झाली की तुम्ही त्यातून काही पैसे देखील काढू शकता.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसbankबँक