दुष्काळात तेरावा, खाद्यतेलामुळे महागाईचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 11:42 AM2021-06-07T11:42:34+5:302021-06-07T12:04:08+5:30

oil : रोजच्या जेवणातला तेल हा महत्त्वाचा घटक असा महागल्याने बचत करण्याकडे कल वाढीस लागला आहे.

कोरोनाच्या कहरामुळे आधीच कातावलेल्या लोकांना रोजच्या जेवणातील तेलही महागल्याने दुष्काळात तेरावा महिना सहन करावा लागत आहे. खाद्यतेलांच्या किमती गगनाला भिडण्यामागे अनेक कारणे आहेत. रोजच्या जेवणातला हा महत्त्वाचा घटक असा महागल्याने बचत करण्याकडे कल वाढीस लागला आहे.

1) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आवक कमी. 2) चीनकडून मोठ्या प्रमाणात खरेदी. 3) मलेशियामध्ये निर्माण झालेला मजुरांचा प्रश्न.

4) इंडोनेशिया आणि मलेशियात पाम तेलाच्या निर्यातीवर आकारण्यात येणारे वाढीव निर्यात शुल्क. 5) पाम आणि मोहरीचे उत्पादन ज्या ठिकाणी घेतले जाते, तेथे लीना चक्रीवादळामुळे झालेले मोठे नुकसान.

1) शेंगदाणा तेल 2) वनस्पती तेल 3) सोयाबीन तेल 4) सूर्यफुलाचे तेल 5) पाम तेल 6) मोहरीचे तेल

1) स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांवर स्प्रेने तेल फवारले तर पदार्थ भांड्यांना चिटकत नाहीत. त्यामुळे तेलाचा वापर कमी होऊ शकतो. ज्या ठिकाणी दोन चमचे तेल लागते, त्या ठिकाणी स्प्रेमुळे अर्धाच चमचा तेल लागू शकते.

अनेकदा भाज्या किंवा तत्सम खाद्यपदार्थांमध्ये प्रमाणाबाहेर तेलाचा वापर केला जातो. त्यामुळे तेलाचा वापर कमी करणे हा सर्वात पहिला आणि सोपा उपाय आहे. याशिवाय डीप फ्राय न करता, शॅलो फ्रायला प्राधान्य द्यावे.

तेलाचे प्रमाण कमी करताना, स्वयंपाकात पाण्याचा वापर वाढविणे हाही एक तेलबचतीचा उपाय आहे. ज्या भाज्यांमध्ये नैसर्गिकरीत्या पाणी असते, त्या भाज्या शिजविण्यात अडचण येत नाही.

कमी पाणी असलेल्या भाज्या पाण्याचा अतिरिक्त वापर करून शिजविता येतील, त्यात तेल कमी लागेल.ज्या भाज्या शिजण्यासाठी अधिक वेळ लागतो, त्या वाफेवर शिजवाव्यात आणि नंतर शॅलो फ्राय कराव्यात.