Income Tax: करदात्यांनो! यापुढे बँक, एलआयसी स्टेटमेंट आयकर विभागाला देण्याची गरज नाही; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 10:58 AM2021-06-07T10:58:16+5:302021-06-07T11:05:31+5:30

Income Tax new portal: आजपासून आयकर विभागाची नविन वेबसाईट (Income Tax new website launch) लाँच होणार आहे. यासाठी गेले 6 दिवस ही वेबसाईट बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये अनेक सुविधा नव्याने देण्यात आल्या आहेत

आयकर भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आजपासून आयकर विभागाची नविन वेबसाईट (Income Tax new website launch) लाँच झाली आहे. यासाठी गेले 6 दिवस ही वेबसाईट बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये अनेक सुविधा नव्याने देण्यात आल्या आहेत. (Income Tax new portal, no need to give bank statment, LIC statement while filling ITR.)

यापैकीच एक म्हणजे यापुढे आयकर भरताना तुम्हाला बँका (bank statment) किंवा एलआयसी पॉलिसीच्या स्टेटमेंट (LIC statement) द्यावी लागणार नाहीत. यासाठी धावाधाव करावी लागणार नाहीय.

होय, कर वाचविण्यासाठी तुम्हाला यापुढे बँक आणि तुमच्या इन्शुरन्सच्या पॉलिसी आयकर विभागाला देण्याची गरज उरलेली नाहीय. हे काम आयकर विभाग स्वत:च करणार आहे. विश्वास बसत नसेल तर तुमचा आयकर सात जूनपासून भरून पहा.

तुम्ही विचार करत असाल की हे कसे होईल, परंतू तुम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे बँक स्टेटमेंटसाठी बँकांच्या अधिकाऱ्यांची मनधरणी किंवा बँकांचे उंबरठे झिजविण्याची गरज राहिलेली नाहीय.

बँकेत कर्ज घेतले असेल, फिक्स्ड डिपॉझिट कापले असेल तर इंटरेस्ट सर्टिफिकीट घ्यावे लागते. घर किंवा जमीनीची खरेदी-विक्री केली असेल तर त्याचे विवरण द्यावे लागते. किती क्लिष्ट काम होते हे. आता हे सारे करावे लागणार नाहीय.

बस एकदा आयकर विभागाचे पोर्टल उघडा आणि पहा. आयकर विभागाने तुमची माहिती चुकीची भरली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही आयकर विभागाला कळवू शकता. किंवा ओके करून मंजुरी देऊ शकता. लगेचच तुमचा आयकर रिटर्न भरला जाईल.

आयकर विभागाच्या आधीच्या वेबसाईटचे युआरएल हे incometaxindiaefiling.gov.in होते. ते आता incometax.gov.in झाले आहे. वेबसाईटवर गेल्यावर तुमचे नाव, पॅन किंवा आधार नंबर टाकल्यावर तुमची सारी माहिती आपोआप भरली जाणार आहे. तुम्हाला ज्या गोष्टी आधार किंवा पॅनशी जोडलेली माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये शाळेची फी, घराचे भाडे आदी.

आयकर विभागाने 30 जुलैला आयकर भरण्याची तारीख 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. यामुळे कोरोना काळामुळे तुम्हाला आयकर भरण्यास पुरेसा वेळ देण्यात आला आहे. तसेच ज्यांचे रिटर्न ऑडिट व्हायचे आहेत ते 30 ऑक्टोबरपर्यंत आयकर रिटर्न भरू शकतात.

जर तुम्हाला या नव्या प्रणालीद्वारे आयकर भरण्यास समस्या येत असेल तर एक हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. कॉल करा, तिथे तुमची समस्या सोडविली जाईल.

तुम्हाला व्हिडीओ पाठविला जाईल, यामध्ये आयकर भरण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखविण्यात तसेच सांगण्यात आली आहे. लवकरच मोबाईल अॅपदेखील लाँच होणार आहे, याद्वारे तुम्ही आयकर भरू शकणार आहात.