1 / 15१७ मे पर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक करदात्यांना २४,७९२ कोटी रूपयांचा रिफंड केल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं बुधवारी दिली. त्यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली.2 / 15या रकमेममध्ये व्यक्तिगत इन्कम टॅक्सची रक्कम ७,४५८ कोटी रूपये असल्याचं विभागाकडून ट्विटरद्वारे सांगण्यात आलं.3 / 15याशिवाय कंपनी कराच्या रुपात १७,३३४ कोटी रूपयांचा रिफंड करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. 4 / 15इन्कम टॅक्स विभागानं दिलेल्या माहितीनुसार सीबीडीटीनं १ एप्रिल २०२१ ते १७ मे २०२१ या कालावधीत १५ लाखांपेक्षा अधिक करदात्यांना २४,७९२ कोटी रूपयांचे रिफंड जारी केले. 5 / 15विभागानं दिलेल्या माहितीनुसार १४.९८ लाख प्रकरणांमध्ये ७,४५८ कोटी रूपयांचा व्यक्तीगत इन्कम टॅक्स रिफंड करण्यात आला. तर दुसरीकडे ४३,६६१ प्रकरणांमध्ये १७,३३४ कोटी रूपयांचा कंपनी रिफंड़ जारी करण्यात आला. परंतु इन्कम टॅक्स विभागानं या रिफंडचं आर्थिक वर्ष मात्र स्पष्ट केलेलं नाही. 6 / 15परंतु हा रिफंड आर्थिक वर्ष २०१९-२० साठी दाखल केलेल्या टॅक्स रिटर्नसाठी असल्याचं मानलं जात आहे. 7 / 15३१ मार्च रोजी संपलेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षादरम्यान विभागानं २.३८ कोटी करदात्यांना २.६२ लाख कोटी रूपयांचे रिफंड जारी केले. आर्थिक वर्ष २०२१-२१ मध्ये जारी करण्यात आलेले रिफंड आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जारी १.८३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ४३.२ टक्के अधिक आहेत.8 / 15इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर त्याच्या व्हेरिफिकेशननंतर ते जेव्हा पाठवलं जातं त्यावेळी इन्कम टॅक्स विभाग त्याची पडताळणी करण्यास सुरूवात करतो.9 / 15जर तुमचा क्लेम स्वीकार झाला तर त्यानंतर रिफंड अमाऊंट थेट तुमच्या बँक खात्यात किंवा चेकद्वारे परत केली जाते. परंतु आयटीआर प्रोसेसिंगसाठी काही वेळ लागतो. तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी खालील प्रोसेस करणं आवश्यक आहे.10 / 15इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या डॅशबोर्ड ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंत व्ह्यू रिटर्न अँड फॉर्म वर क्लिक करा. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्नच्या पेजवर जाण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न यावर क्लिक करा.11 / 15इन्कम टॅक्स रिटर्नच्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा ITR प्रोसेस झाला आहे का किंवा व्हेरिफिकेशनसाठी पेंडिंग आहे का हे दाखवेल.12 / 15जर तुमचा आयटीआर व्हेरिफाय झालेला दाखवत नसेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डाच्या मदतीनं तो पुन्हा व्हेरिफाय करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता.13 / 15याशिवाय तुम्ही सही केलेला ITR-V फॉर्म केवळ भारतीय पोस्ट ऑफिसच्या सामान्य पोस्ट किंवा स्पीड पोस्ट सेवेद्वारे इन्कम टॅक्स सीपीसी ऑफिसमध्ये पाठवू शकता.14 / 15याशिवाय तुम्ही सही केलेला ITR-V फॉर्म केवळ भारतीय पोस्ट ऑफिसच्या सामान्य पोस्ट किंवा स्पीड पोस्ट सेवेद्वारे इन्कम टॅक्स सीपीसी ऑफिसमध्ये पाठवू शकता. जोवर तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेसफुली व्हेरिफाईड असं लिहिलेलं येत नाही तोवर तुम्हाला रिफंड मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल.15 / 15जर आयटीआर प्रोसेस झाला नसेल तर करदाता CPC अथवा अॅक्सेसिंग अधिऱ्याकडे आपली तक्रार दाखल करू शकतो. याद्वारे आयटीआर प्रोसेसिंग वेगवान केली जावी असंही करदाता विनंती करू शकतो.