ट्रेन सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांपर्यंत सीटवर पोहोचला नाहीत तर कॅन्सल होईल तिकीट? असा आहे नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 04:16 PM2023-07-19T16:16:02+5:302023-07-19T16:35:40+5:30

आता टीटीई आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी केवळ 10 मिनिटांचीच वाट पाहील.

जर आपण आपल्या बोर्डिंग स्टेशनपासून 10 मिनिटांनंतर, ट्रेनमध्ये आपल्या सीटवर दिसला नाहीत तर आपले तिकीट कॅन्सल होऊ शकते.

जर आपण ट्रेनमधील आपल्या आरक्षित सीटवर उशिरा पोहोचलात तर, आपल्यासाठी अवघड होऊ शकते. कारण आता टीटीई आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी केवळ 10 मिनिटांचीच वाट पाहील.

यापूर्वी, एक-दोन स्टेशननंतरही प्रवासी आपल्या सीटवर पोहोचले, तरी टीटीई त्यांची उपस्थिती मार्क करत होता. मात्र आता असे होणार नाही. आता प्रवाशांना केवळ 10 मिनिटांचाच वेळ मिळेल.

आता चेंकिंग स्टाफ हॅन्ड हेल्ड टर्मिनलच्या माध्यमाने तिकीट चेकिंग करतात. यात प्रवासी आला आहे किंवा नाही याची माहिती द्यावी लागते. यापूर्वी हे काम कागदांवर चालायचे. यात टीटीई पुढील स्टेशनपर्यंत वाट पाहत होता.

एका दैनिकात, रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गेनायझेशनच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने, आता ज्या स्टेशनवरून प्रवास सुरू करायचा आहे त्याच स्टेशनवरून ट्रेनमध्ये बसावे लागेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

यामुळे, ज्या स्टेशनवरून तिकीट असेल, त्या स्टेशनवर वेळेत पोहोचणे अत्यंत आवश्यक असेल. अपवादात्मक परिस्थितीत ट्रेनमधील गर्दीमुळे टीटीला आपल्या जागेवर येण्यास विलंबही होऊ शकतो. हे देखील या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे.