शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 08:56 IST

1 / 7
Post Office Schemes: रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे, ज्यातील निर्णयांची माहिती शुक्रवारी दिली जाईल. महागाई दर नियंत्रणात असल्यानं, RBI पुन्हा एकदा रेपो दरात कपात करू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
2 / 7
जर रेपो दरात कपात झाली तर देशभरातील बँका पुन्हा एकदा एफडीवरील व्याजदर कमी करतील. परंतु, पोस्ट ऑफिस एफडी योजनेवर तुम्हाला पूर्वीप्रमाणेच जास्त व्याज मिळत राहील. आज आपण येथे जाणून घेऊ की पोस्ट ऑफिसमध्ये ६० महिन्यांच्या एफडी योजनेत २ लाख रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील.
3 / 7
आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानं पोस्ट ऑफिस एफडी योजनांवरील व्याजदरांवर कोणताही परिणाम होणार नाही. प्रत्यक्षात, ३० सप्टेंबर रोजीच अर्थ मंत्रालयाने पोस्ट ऑफिस बचत योजनांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत व्याजदर निश्चित केले होते. पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांसाठी एफडी खातं उघडता येतं.
4 / 7
पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्षाच्या एफडीवर ६.९ टक्के, २ वर्षाच्या एफडीवर ७.० टक्के, ३ वर्षाच्या एफडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्कं इतकं बंपर व्याज दिलं जात आहे. पोस्ट ऑफिसमधील एफडीला टीडी म्हणजेच टाईम डिपॉझिट म्हणतात. या योजनेमध्ये गुंतवलेली तुमची रक्कम सुरक्षितही असते.
5 / 7
पोस्ट ऑफिस ५ वर्षांच्या मुदतीच्या एफडी योजनांवर ७.५ टक्के इतका सर्वाधिक व्याजदर देत आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या (६० महिन्यांच्या) एफडी योजनेत २ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,८९,९९० रुपये मिळतील, ज्यामध्ये ८९,९९० रुपये निश्चित व्याज समाविष्ट आहे.
6 / 7
सध्या देशातील कोणतीही बँक ५ वर्षांच्या एफडी योजनेवर ७.५ टक्के व्याज देत नाही. लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिस एफडी योजनेअंतर्गत सर्व ग्राहकांना समान व्याजदर मिळतो, तर बँकांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांना निवडक कालावधीच्या एफडी योजनांवर ०.५० टक्के जास्त व्याज मिळतं.
7 / 7
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकGovernmentसरकारMONEYपैसा