तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे का? मग 'हे' काम लवकर करा, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:42 IST2022-10-12T12:37:55+5:302022-10-12T12:42:25+5:30
Aadhaar Card Update: आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अपडेट करता येतो.

नवी दिल्ली : ज्या लोकांचे आधार कार्ड 10 वर्षे जुने आहे. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) अशा लोकांना आपल्या सर्व आधार कार्डची माहिती अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
UIDAI ने आधार कार्ड धारकांना आपल्या ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याशी संबंधित कागदपत्रे अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अपडेट करता येतो.
UIDAI नुसार, ज्या लोकांचे आधार दहा वर्षांपूर्वी तयार झाले होते आणि त्यांनी एकदाही ते अपडेट केले नाही, अशा लोकांना आधार अपडेट करणे आवश्यक आहे. दरम्यान, अपडटे करणे बंधनकारक नसल्याचेही UIDAI ने स्पष्ट केले आहे. पण, अपडेट करणे हे आधार कार्डधारकांच्या हिताचे आहे.
UIDAI ने म्हटले आहे की, "ज्या व्यक्तींनी दहा वर्षांपूर्वी त्यांचे आधार बनवले होते आणि त्यानंतर या वर्षांत कधीही अपडेट केलेले नाही, अशा आधार नंबर धारकांना दस्तऐवज अपडेट करण्याची विनंती केली जाते."
असे करा अपडेट
UIDAI म्हणणे की, आधार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अपडेट करता येतो. आधार ऑनलाइन अपडेट करण्यासाठी, MyAadhaar पोर्टलला भेट द्यावी लागेल. त्याचबरोबर आधार कार्डधारक आधार केंद्रावर जाऊनही हे काम करू शकतात. यासाठी त्यांना काही फी भरावी लागेल.
UIDAI एक वैधानिक प्राधिकरण
दरम्यान, UIDAI एक वैधानिक प्राधिकरण आहे, ज्याची स्थापना भारत सरकारने आधार कायदा, 2016 अंतर्गत 12 जुलै 2016 रोजी केली आहे. सर्व रहिवाशांना 'आधार' नावाचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UID) जारी करण्याच्या उद्देशाने UIDAI ची स्थापना करण्यात आली होती.