EPFO अकाऊंटमध्ये कसं कराल बँक डिटेल्स अपडेट; समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:53 PM2021-04-12T13:53:27+5:302021-04-12T14:01:27+5:30

अनेकदा तुम्ही तुमचं EPFO खातं अपडेट केलं नाही तर ते निष्क्रिय होण्याचीदेखील शक्यता असते.

खासगी क्षेत्रात काम करत असताना अनेक जण कोणत्या ना कोणत्या कारणानं आपली नोकरी बदलत असतात. त्यामुळे त्यांना आपलं पीएफ अकाऊंट अपडेट ठेवणं आवश्यक असतं.

जर तुम्ही तुमचं पीएफ खातं अपडेटेड ठेवलं नाही तर तुमचं खातं निष्क्रिय होऊ शकतं. जाणून घेऊया कशी करता येईल बँक डिटेल्स अपडेट.

बँकेशी लिंक्ड कर्मचाऱ्याचा युएन नंबर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अपडेट केला जाऊ शकतो.

यासाठी ग्राहकाला आपल्या EPFO मेम्बर पोर्टलवर लॉग इन करावं लागेल. त्यानंतर मॅनेज टॅबवर जाऊन केव्हायसी ऑप्शन निवडावा लागेल.

बँक ऑप्शनवर जाऊन कर्मचाऱ्याला आपली माहिती भरावी लागेल. त्यानंतर ती सेव्ह करावी लागेल. हीच प्रक्रिया तुम्हाला ज्या कंपनीनं नियुक्त केलं आहे त्यांच्याकडूनही व्हावी लागते. त्यानंतर पीएफ कार्यालयातून परवानगी मिळाल्यानंतर बँक डिटेल्स अपडेट होती.

जर तुम्ही आता कंपनीचे कर्मचारी नसाल आणि जर तुम्हाला तुमची आधीची कंपनी मदत करत नसेल तर तुम्ही ऑफलाईनदेखील अर्ज करू शकता. तुम्हाला पीएफ कार्यालयात जाऊन आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतील. त्यानंतर तुम्हाला बँक खातं अपडेट करण्यासाठी लिखीत स्वरूपात अर्ज द्यावा लागेल.

जसं तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण कराल. त्यानंतर तुम्हाला EPFO मेम्बर पोर्टलवर जाऊन ऑनलाइन सर्व्हिस टॅबवर ऑनलाइन क्लेम करावा लागेल.

तुमचा फॉर्म व्हेरिफाय झाल्यानंतर तो फंड तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होईल.

नियमांनुसार जर कर्मचाऱ्याचं वय ५५ वर्षे पूर्ण झालं असेल अथवा परदेशात स्थलांतर किंवा मृत्यूच्या स्थितीत त्यांना पीएफ व्याज तीन वर्षांसाठी मिळत नाही.

परंतु जर ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी निवृत्त झाला तर त्याला कोणत्याही कॉन्ट्रीब्युशनशिवाय व्याज मिळू शकतं.