५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:33 IST2025-09-09T16:26:55+5:302025-09-09T16:33:51+5:30
Home Loan : जर तुम्ही २० वर्षांसाठी ५० लाखांचे गृहकर्ज घेतलं तर प्रत्यक्षात तुम्हाला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरावी लागेल. पण, एक स्मार्ट निर्णय घेऊन तुम्ही हे व्याजाचे पैसे परत मिळवू शकता.

Home Loan : जर तुम्ही २० वर्षांसाठी ५० लाखांचे गृहकर्ज घेतलं तर प्रत्यक्षात तुम्हाला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरावी लागेल. पण, एक स्मार्ट निर्णय घेऊन तुम्ही हे व्याजाचे पैसे परत मिळवू शकता.
होय, कर्ज घेण्यासोबतच एक छोटीशी पण प्रभावी कृती केल्यास तुमचे गृहकर्ज लवकर संपेल आणि व्याजावर मोठी बचतही होईल. चला, हा स्मार्ट मार्ग जाणून घेऊया.
समजा, तुम्ही बँक किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडून ५० लाख रुपयांचे गृहकर्ज २० वर्षांसाठी घेत आहात. जर या कर्जाचा वार्षिक व्याजदर ८% असेल, तर तुमची मासिक ईएमआय सुमारे ४१,८२२ रुपये होईल.
या हिशोबानुसार, पुढील २० वर्षांत तुम्ही मूळ कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त, तब्बल ५०,३७,२८१ रुपये फक्त व्याजाच्या रूपात बँकेला द्याल. याचाच अर्थ, तुम्हाला एकूण १,००,३७,२८१ रुपये भरावे लागतील, जी मूळ कर्जाच्या रकमेपेक्षा दुप्पट आहे!
तुम्ही याच कर्जाला 'एसआयपी' (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातून व्याजमुक्त करू शकता. वर उल्लेख केलेल्या ५०,३७,२८१ रुपयांच्या व्याजाची रक्कम एसआयपीच्या मदतीने पुन्हा मिळवता येते. म्युच्युअल फंडमध्ये परताव्याची कोणतीही निश्चित मर्यादा नसते, पण १२% सरासरी परतावा गृहीत धरून आपण हा हिशोब समजून घेऊ.
या गणितानुसार, २० वर्षांत ५०,३७,२८१ रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला दरमहा फक्त ५,०५० रुपयांची एसआयपी करावी लागेल. जर तुम्ही दरमहा ५,०५० रुपयांची एसआयपी २० वर्षांसाठी १२% परतावा दराने केली, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य ५०,४५,६९७ रुपये होईल. म्हणजे, तुमच्या गृहकर्जावर तुम्ही भरलेल्या व्याजाची संपूर्ण रक्कम तुम्हाला परत मिळेल.
याचा अर्थ, जर तुम्ही दरमहा ५,०५० रुपयांची एसआयपी सुरू केली आणि ती २० वर्षांपर्यंत चालू ठेवली, तर तुम्ही तुमच्या ५० लाख रुपयांच्या गृहकर्जावरील संपूर्ण व्याज (५०,३७,२८१ रुपये) कोणत्याही अतिरिक्त आर्थिक दबावाशिवाय परत मिळवू शकता.
ही एक स्मार्ट आर्थिक रणनीती आहे, जी तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या दिलासा देते आणि दीर्घकाळात संपत्ती निर्मितीसाठीही एक उत्तम मार्ग ठरते.