१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:12 IST2026-01-01T10:56:51+5:302026-01-01T11:12:01+5:30

जर तुम्हाला तुमचे पैसे एकाच वेळी गुंतवायचे असतील आणि सुरक्षित ठेवायचे असतील, तर तुमच्यासाठी बँक एफडी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

जर तुम्हाला तुमचे पैसे एकाच वेळी गुंतवायचे असतील आणि सुरक्षित ठेवायचे असतील, तर तुमच्यासाठी बँक एफडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी तुम्ही बँक एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. बँक एफडीमध्ये तुम्हाला एका निश्चित व्याजदराने परतावा मिळेल. तसंच, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी तुमचे पैसे गुंतवू शकता.

देशातील विविध बँकांकडून त्यांच्या बँक एफडीवर वेगवेगळ्या व्याजदरानं परतावा दिला जातो. अशा परिस्थितीत, तुम्ही अशा बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी जिथे व्याजदर जास्त असतील. आज आम्ही तुम्हाला विविध बँकांच्या १ वर्षाच्या एफडीबद्दल सांगणार आहोत आणि १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कोणत्या बँकेत किती परतावा मिळेल हे देखील सांगणार आहोत. जाणून घेऊया.

१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा

HDFC बँकेची १ वर्षाची एफडी - देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC बँक आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.२५ टक्के व्याजदरानं परतावा देते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,०६,३९८ रुपये मिळतील.

PNB ची १ वर्षाची एफडी - देशातील दिग्गज सरकारी बँक PNB आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.२५ टक्के व्याजदरानं परतावा देते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,०६,३९८ रुपये मिळतील.

कॅनरा बँकेची १ वर्षाची एफडी - सरकारी बँक कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ५.९० टक्के व्याजदरानं परतावा देते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,०६,०३२ रुपये मिळतील.

ॲक्सिस बँकेची १ वर्षाची एफडी - दिग्गज खाजगी बँक ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.२५ टक्के व्याजदरानं परतावा देते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,०६,३९८ रुपये मिळतील.

ICICI बँकेची १ वर्षाची एफडी - दिग्गज खाजगी बँक ICICI बँक आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.२५ टक्के व्याजदरानं परतावा देते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,०६,३९८ रुपये मिळतील.

BOB ची १ वर्षाची एफडी - दिग्गज सरकारी बँक BOB म्हणजेच बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.२५ टक्के व्याजदरानं परतावा देते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,०६,३९८ रुपये मिळतील.

देशातील बहुतांश बँका त्यांच्या १ वर्षाच्या एफडीवर ६.२५ टक्के व्याजदरानेच परतावा देत आहेत. त्यामुळे सर्व बँकांकडून मिळणारा परतावा जवळपास समान आहे. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांता सल्ला घेणं आवश्यक आहे.)