Post Office च्या MIS स्कीम मध्ये ₹२,००,००० जमा केले तर दर महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 09:13 IST2026-01-29T08:55:13+5:302026-01-29T09:13:59+5:30

Post Office Investment: हल्ली अनेक जण गुंतवणूकीकडे वळताना दिसत आहेत. परंतु आपली गुंतवणूक ही सुरक्षित राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पोस्टाच्या स्कीम्सना सरकारचा पाठींबा असल्यानं यातील गुंतवणूक ही सुरक्षित असते.

Post Office Investment: हल्ली अनेक जण गुंतवणूकीकडे वळताना दिसत आहेत. परंतु आपली गुंतवणूक ही सुरक्षित राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पोस्टाच्या स्कीम्सना सरकारचा पाठींबा असल्यानं यातील गुंतवणूक ही सुरक्षित असते.

देशातील मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिक आजही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर पूर्ण विश्वास ठेवतात. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये नागरिकांना केवळ सुरक्षितताच मिळत नाही, तर उत्तम परतावा देखील मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजनांमध्ये मंथली इनकम स्कीम (MIS) अत्यंत लोकप्रिय आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना ५ वर्षांपर्यंत दरमहा व्याजाच्या स्वरूपात ठराविक रक्कम मिळत राहते. जर या योजनेत २ लाख रुपये जमा केले, तर दरमहा किती व्याज मिळेल याची माहिती जाणून घेऊ.

पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमवर सध्या ७.४ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. या योजनेत फक्त एकदाच पैसे जमा करावे लागतात आणि त्यानंतर दरमहा व्याजाचा लाभ मिळतो. ही योजना ५ वर्षांनी म‌ॅच्युअर होते आणि यामध्ये किमान १००० रुपयांपासून खातं उघडता येतं.

एमआयएस योजनेअंतर्गत सिंगल आणि जॉइंट अशी दोन्ही प्रकारची खाती उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करता येतात, तर जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपयांपर्यंत मर्यादा आहे. या संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ३ व्यक्तींची नावं जोडता येतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूकदाराला फक्त एकदाच पैसे गुंतवावे लागतात आणि त्या बदल्यात दरमहा व्याजाचे पैसे दिले जातात. व्याजाची ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. जर तुम्ही या स्कीममध्ये २ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला दरमहा १२३३ रुपये इतकं निश्चित व्याज मिळेल. ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीचे सर्व पैसे तुमच्या खात्यात परत वर्ग केले जातात.

पोस्ट ऑफिसमध्ये एमआयएस खातं उघडण्यासाठी तुमच्याकडे आधीपासून पोस्ट ऑफिसचे बचत खातं असणं अनिवार्य आहे. जर तुमचं बचत खाते नसेल, तर तुम्हाला प्रथम ते उघडावं लागेल. त्यानंतरच तुम्ही मंथली इनकम स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता, कारण व्याजाचे सर्व पैसे तुमच्या याच बचत खात्यात जमा केले जातात.