पॅन कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर तुम्ही 'या' सोप्या पद्धतीने पुन्हा अर्ज करू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 11:27 AM2021-10-17T11:27:57+5:302021-10-17T11:48:49+5:30

Pan Card : पॅन कार्डसाठी तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता. पहिले ऑनलाइन आणि दुसरे ऑफलाइन.

सध्याच्या काळात आपली सर्व कागदपत्रे आपल्यासाठी खूप महत्वाची झाली आहेत, त्यापैकी एक पॅन कार्ड आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी सुविधांचा लाभ घेण्यापर्यंत, इतर अनेक गोष्टींसाठी पॅन कार्ड आवश्यक बनले आहे. म्हणूनच प्रत्येकाला हे महत्वाचे डॉक्युमेंट्स बनले आहे.

हे कार्डच्या स्वरूपात आहे, ज्यात तुमचा फोटो, तुमचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तुमची स्वाक्षरी आणि तुमचा कायमचा खाते क्रमांक यासारख्या गोष्टी आहेत. या कार्डसाठी तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता. पहिले ऑनलाइन आणि दुसरे ऑफलाइन.

मात्र, ज्यावेळी हे पॅन कार्ड हरवले किंवा चोरीला गेले, तर साधारणपणे असे दिसून येते की लोक खूप अस्वस्थ होतात. अशा परिस्थितीत काय करावे? हे जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच, हे पॅन कार्ड पुन्हा बनवण्याचा मार्ग काय आहे? याबद्दल जाणून घेऊया...

पॅन कार्ड पुन्हा प्रिन्टसाठी तुम्हाला आधी https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html या लिंकवर जावे लागेल.

या लिंकवर जाऊन तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यात तुमचा पॅन नंबर (हरवलेला किंवा चोरीला गेलेला पॅन कार्ड नंबर), आधार कार्ड, जन्मतारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल.

यासह, तुम्हाला आधार कार्डची माहिती वापरण्यासाठी संमती देखील द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

याचबरोबर, तुम्हाला तुमचे कार्ड घरी ऑर्डर करण्यासाठी काही फी देखील भरावी लागेल. यासाठी तुम्हाला https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homereprint या लिंकवर जावे लागेल.

माहितीनुसार, जर तुम्हाला हे पॅन कार्ड भारतात मागवायचे असेल, तर तुम्हाला यासाठी 50 रुपये द्यावे लागतील आणि जर तुम्हाला ते देशाबाहेर मागवायचे असेल तर तुम्हाला यासाठी 959 रुपये द्यावे लागतील.