Hero MotoCorp भारतात लाँच करणार नवी Electric Scooter, bike; तैवानच्या कंपनीसोबत केला करार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 04:58 PM2021-04-22T16:58:02+5:302021-04-22T17:09:12+5:30

Hero MotoCorp नं केला तैवानच्या Gogoro कंपनीसोबत करार

जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक गाड्यांचा समावेश आहे.

कंपनीकडे स्मॉल कॅपॅसिटी बाईक्स, ADVs देखील आहे. परंतु सध्या मोठी मागणी असलेल्या इलेक्ट्रिक वाहनं मात्र कंपनीकडे नाहीत.

याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कुटुंबात झालेल्या करारांतर्गत हीरो इलेक्ट्रिक्स केवळ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करतं. तर हिरो मोटोकॉर्पकडे ICE वाहन आहेत.

सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे आता हीरो मोटोकॉर्पनंदेखील इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये तैवानची कंपनी Gogoro च्या मदतीनं उतरणार आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार हीरो या ब्रान्डच्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच केल्या जातील.

Gogoro च्या बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीचा कंपनीला सपोर्ट मइळणार आहे. या इलेक्ट्रिक मोटरसायकल, स्कूटर Gogoro चं तंत्रज्ञान वापरणार आहे.

तसंच या मोटरसायकलचं आणि स्कूटरचं मार्केटिंग हे हीरो मोटोकॉर्पद्वारे केलं जाईल. हीरो मोटोकॉर्पेकडे भारतातील सर्वात मोठ्या डिस्ट्रिब्युशन मार्केटपैकी एक मार्केट आहे.

कंपनीनं यापूर्वी प्रीमिअम वाहनांची निर्मिती करणाऱ्या Erik Buell सोबत पार्टनरशिप केली होती. परंतु बाजारात त्यांची अधिक उत्पादनं आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार Gogoro ही कंपनी भारतात बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजसाठी पायाभरणी करणार आहे. यानंतर हीरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक वाहनं लाँच करू शकते.

Gogoro ही कंपनीदेखील स्वत:च्या ईलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटर तयार करते. हीरो मोटोकॉर्प Gogoro च्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता आहे.

परंतु कंपनी भारतीय बाजारपेठेनुसार स्वत:च्या स्कूटर डिझाईन करेल. बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीस एक ग्राहक कोणत्याही सेंटरवर जाऊ शकतो.

अॅपचा वापरही ग्राहकांना करता येतो. केवळ संपलेल्या बॅटरीच्या बदल्यात ग्राहकांना काही मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज झालेली बॅटरीही मिळू शकते.

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत हीरो मोटोकॉर्पनं आपले सर्व प्रकल्प १ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या कालावधीत उत्पादन बंद असलं तरी आवश्यक ते मेन्टेनन्सचं काम केलं जाणार असल्याचं कंपनीनं शेअर बाजाराला सांगितलं.

२२ एप्रिल ते १ मे दरम्यान सर्व प्रकल्प आणि जीपीसी टप्प्याटप्प्यानं चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं.