दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर गिफ्ट! महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार, एवढे रुपये वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 02:30 PM2023-09-19T14:30:51+5:302023-09-19T14:33:55+5:30

केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करू शकते.

दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करू शकते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात तीन टक्के वाढ होऊ शकते.

सध्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ४२ टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. ज्यामध्ये ३ टक्क्यांच्या वाढीनंतर ते ४५ टक्क्यांवर पोहोचेल. यासोबतच, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई सवलतीतही वाढ होऊ शकते.

सरकार लवकरच डीए वाढवण्याची घोषणा करू शकते. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी मिळू शकते.

यावेळी डीएमध्ये वाढ केल्यास ती तीन टक्क्यांनी वाढू शकते. कर्मचाऱ्यांनी डीएमध्ये चार टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. सरकारने हे मान्य केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४६ टक्के होईल.

जर एखाद्या कर्मचाऱ्याला दरमहा ३६,५०० रुपये मूळ वेतन मिळत असेल, तर सध्या त्याचा DA १५,३३० रुपये आहे. जुलै २०२३ पासून डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केल्यास त्यांचा डीए १,०९५ रुपयांनी वाढून १६,४२५ रुपये होईल. यासोबतच जुलैपासून थकबाकीही मिळणार आहे.

केंद्र सरकारने १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ दरम्यान १८ महिन्यांच्या कोरोना कालावधीत आपल्या कर्मचाऱ्यांना डीए दिलेला नाही. त्याचप्रमाणे, या कालावधीत पेन्शनधारकांना महागाई रिलीफ म्हणजेच डीआर अदा करण्यात आले नाही. त्याचा उद्देश सरकारवरील आर्थिक बोजा कमी करणे हा होता.

या निर्णयामुळे सरकारचे ३४,४०२.३२ कोटी रुपये वाचले. अनेक दिवसांपासून कर्मचार्‍यांची मागणी होती. मात्र ते दिले जाणार नसल्याचे आज सरकारने स्पष्ट केले. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

टॅग्स :सरकारGovernment