Gold Price Today: आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरुच, फटाफट चेक करा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 02:55 PM2023-05-20T14:55:37+5:302023-05-20T14:59:35+5:30

Gold Price Today: शनिवारीही सोन्याचे दर ३००-४०० रुपयांनी कमी झाले.

Gold Price Today: शनिवारीही सोन्याचे दर ३००-४०० रुपयांनी कमी झाले. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ५५,८०० रुपये होता, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,८७० रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलानंतर उत्तर प्रदेशच्या मेरठ सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. शनिवारी सोन्याच्या प्रति १० ग्रॅमच्या दरात १०० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.

चांदीनेही मोठी झेप घेतली आहे. १०० रुपयांच्या घसरणीसह १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ६१,७०० रुपयांवर पोहोचला आहे.

७५० रुपयांच्या वाढीसह चांदीचा भाव ७२,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. शुक्रवारी २४ कॅरेट सोने ६१,८०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ७२,१५० रुपये प्रति किलो दराने विकली जात होती.

शनिवारी २२ कॅरेट सोने ५६,५८८ रुपये प्रति १० ग्रॅम, १८ कॅरेट सोने ४६,२७५ रुपये आणि १४ कॅरेट सोने ३५,९९१ रुपयांवर व्यवहार करत आहे.

जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर ही एक चांगली संधी आहे. गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे.

बुधवारी चांदीच्या दरात ६५० रुपयांची वाढ दिसून आली. त्यानंतर चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू होती, मात्र शनिवारी पुन्हा एकदा ७५० रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचा दर ७२,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

शुक्रवारी २०० रुपयांच्या घसरणीसह चांदी ७२,१५० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध झाली. सराफा व्यापारी आकाश सांगतात की, सोन्या-चांदीच्या किमतीत रोजचे बदल दिसून येतात.