Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 09:46 IST2025-07-05T09:24:46+5:302025-07-05T09:46:27+5:30
जगभरातील काही देशांमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.

युद्धामुळे जगभरात अस्थिरता निर्माण झाल्यामुळे सोन्याच्या किमती दरदिवशी नव्या शिखरावर जात आहेत. गेल्या एका वर्षात डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली.
कोरोनानंतरच्या अस्थिर जागतिक घडामोडी आणि मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने सोन्याला लाभ मिळाला होता. मात्र, लवकरच सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ आणि संशोधकांनी व्यक्त केली आहे.
सिटी, मोतीलाल ओसवाल आणि फिच रेटिंग्जच्या बीएमआय या संशोधन संस्थेनेही सोन्याच्या किमतीत होणारी वाढ आता संपणार असल्याचा इशारा दिला आहे. २०२६च्या दुसऱ्या सहामाहीत सोन्याचे भाव २,५०० ते २,७०० डॉलर प्रति औंस होण्याची शक्यता सिटीने वर्तवली आहे, तर दरवर्षी ३२% पेक्षा जास्त वाढ ही दुर्मिळ असते,.
त्यामुळे आताचा वेग थांबण्याची शक्यता मोतीलाल ओसवालने म्हटले आहे, तर सोन्याच्या किमतीवर घसरण होण्याचा दबाव वाढत असला तरी सोन्याच्या किमती कोरोनापूर्व पातळीवर परत येण्याची शक्यता कमी आहे.
सोन्याच्या किमती अशा वाढल्या- ३ जाने. २०२२- १८०१, ३ जुलै २०२५- ३३४४
शॉर्ट टर्मलाँग टर्म- सिटी बँक३००० ते ३५०० २५०० ते २७००, बीएमआय३,००० ते ३,१०० २७२०, आयसीआयआय बँक३००० ते ३२०० ३३०० ते ३५००
पुढे काय होईल? : दि. ९ जुलै रोजी अमेरिकेच्या व्यापारसंबंधी टॅरिफच्या मुदतीचा परिणामही सोन्याच्या किमतींवर होऊ शकतो. व्यापारात अडथळे निर्माण झाल्यास किमती पुन्हा वाढू शकतात.
२०२५ ते २०२९ दरम्यान सोन्याचे भाव सरासरी २,७२० डॉलर प्रति औंस राहतील. सोन्याचे भाव २०१९ मध्ये १,३९३ औंसवर प्रति औंस डॉलर होते, असे फिच रेटिंग्जने म्हटले आहे.
सोन्याच्या किमतीत मोठी घट होण्याचा अंदाज सिटीने वर्तवला आहे. सिटीचे विश्लेषक मॅक्स लेटन यांनी म्हटले की सोन्याच्या किमतीतील घसरण गुंतवणूक मागणी कमी होणे, जागतिक वाढीच्या शक्यतांमध्ये सुधारणा, फेडरल रिझर्व्हने केलेल्या दर कपातीमुळे होऊ शकते.
तर मोतीलाल ओसवालनुसार, सोन्याचे दर काहीकाळ स्थिर राहतील किंवा कमी होतील. त्यामुळे सध्याच्या दरांवर गुंतवणूक करताना सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
भारतामध्ये सोनं आणि चांदीमध्ये मोठी गुतंवणूक केली जाते. पण, सध्या दर वाढले असल्यामुळे अनेकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे.