Gold Price : सोन्याची 'दर'वाढ, तरीही 'ऑल टाईम हाय'पेक्षा ११ हजार रूपयांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 07:15 PM2021-03-19T19:15:23+5:302021-03-19T19:19:30+5:30

Gold Price : लग्नाचा सीझन सुरू होण्यापूर्वी सोन्याला पुन्हा येऊ लागली झळाळी, पाहा काय आहेत नवे दर

आता लग्नाचा सीझन सुरू होण्यापूर्वी सराफा बाजारात सोन्याला पुन्हा एकदा झळाळी येत असल्याचं दिसून येत आहे.

शुक्रवारी १९ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात सुरूवातीच्या सत्रात २३४ रूपयांची वाढ झाली. यानंतर सोन्याचे दर केवळ ७६ रूपयांनी वाढून ४४ हजार ९३७ रूपयांवर बंद झाले.

एकीकडे सोन्याचे दर जरी वाढत असले तरी चांदीच्या दरात मात्र २३४ रूपये प्रति किलोची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सुरूवातीच्या सत्रात चांदी ६६ हजार ७०७ रूपये प्रति किलोच्या दरावर उघडली.

परंतु अखेरच्या सत्रात चादी ६६ हजार ८१५ रूपयांवर बंद झाली. गुरूवारच्या तुलनेत चांदीच्या दरात २३४ रूपयांची घरसण झाली.

दुसरीकडे २३ कॅरेट सोन्याचे दर ४४ हजार ७५७ रूपये प्रति १० ग्राम वर पोहोचले. तर २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे ४१ हजार १६२ रूपये व ३३ हजार ७०३ रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचले.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे जारी करण्यात आलेल्या या दरात तुमच्या शहराच्या दरात ५०० ते १००० रूपयांचा फरक असू शकतो.

सध्या आपल्या लाईफ टाईम हाय पेक्षा सोन्याचे दर हे ११ हजार रूपयांत पर्यंत कमी झाले आहेत. सध्या सोन्याच्या दरात तितकी वाढ न होण्याचं कारण US Bond Yeild आपल्या १४ महिन्यांच्या हायवर पोहोचल्याचं जाणकारांकडून म्हटलं जात आहे.

जाणकांच्या म्हणण्यानुसार आता दागिन्यांची मागणी वाढताना दिसेल. स्वित्झर्लंडनं सप्टेंबरनंतर फेब्रुवारी महिन्यात चीनला सोनं पाठवलं आहे.

फेब्रुवारी महिन्याचं भारताचं शिपमेंटही अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं आहे. इंडिया रेटिंग्सनुसार रिटेल दागिन्यांच्या बाजारात ३५ टक्क्यांपर्यंतची उसळी शक्य असल्याचंही जाणकारांचं म्हणणं आहे.

सध्या आगामी लग्नाच्या सीझनमुळेही सोन्याची मागणी वाढेल असं जाणकारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आता सरकारनं सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क अनिवार्य केला आहे. १ जून २०२१ नंतर हॉलमार्क नसलेले दागिने विकता येणार नाहीत.

यापूर्वी हा निर्णय १५ जानेवारी २०२१ रोजी लागू होणार होता. परंतु ज्वेलर्स संघटनेच्या मागणीनंतर त्यांना १ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जाते. भारतात दरवर्षी ७००-८०० टन सोनं आयात होत असल्याचं ब्लुमबर्गच्या अहवालात म्हटलं होतं.

हॉलमार्कवरून सोन्याची शुद्धता समजते. सध्या हॉलमार्क असलेलेच दागिने विकणं हे अनिवार्य नाही. दरम्यान, १९ मार्च रोजी स २४ कॅरेट सोन्याचे दर ४४,९३७ रूपये प्रति १० ग्राम, २३ कॅरेट सोन्याचे दर ४४,७५७ रूपये प्रति १० ग्राहम तर २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे ४१,१६२ रूपये व ३३७०३ रूपये प्रति १० ग्राम इतके झाले आहेत.