सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:08 IST2025-04-25T15:05:17+5:302025-04-25T15:08:14+5:30
Gold Price In Pakistan : पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या सर्वात वाईट पातळीवर आहे. सरकार चालवण्यासाठी देखील त्यांना कर्ज घ्यावे लागत आहे. पण, एका बाबतीत पाकिस्तानने भारताला मागे टाकलं आहे.

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी सिंधू पाणी करार आणि अटारी वाघा सीमा व्यापारी मार्ग बंद केला आहे. पण, पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली आहे. यासाठी एकच उदाहरण पुरेस आहे, ते म्हणजे सोन्याची किंमत.
भारतात सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या पुढे गेला तेव्हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. पण, पाकिस्तानमध्ये सोन्याचे भाव भारतापेक्षाही वेगाने वाढले आहेत. आपल्या देशात अजूनही आपण सोने घेण्याचा विचार करू. पाकिस्तानमध्ये सोन्याची किंमत ऐकूनच लोक दूर पळत आहेत.
पाकिस्तानमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ३ लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत. म्हणजे एका तोळ्यासाठी ३ लाख रुपये मोजावे लागतील.
आजच्या दिवशी २५ एप्रिल रोजी १० ग्रॅम पाकिस्तानी सोन्याची किंमत ३,१९,९९० रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्यावर घडणावर आणि इतर कर लागून किंमत नक्कीच ४ लाखांच्या जवळपास पोहोचेल.
भारताबद्दल बोलायचे झाले तर, या आठवड्यात सोन्याने १ लाखांचा टप्पा ओलांडून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. सध्या, बातमी लिहिण्याच्या वेळी, भारतात २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८२४० रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे.
भारताबद्दल बोलायचे झाले तर, सोन्याच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीपेक्षा सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.