Gold Price : बजेटपूर्वीच आली आनंदाची बातमी, सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 09:34 PM2023-01-31T21:34:24+5:302023-01-31T21:53:24+5:30

आज दिल्लीत सोन्याचा भाव 57,000 च्या खाली घसरला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने यासंदर्भात माहिती दिली आहे.

आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. अर्थसंकल्पापूर्वी सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमती घसरल्या आहेत. यावेळी तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

देशाची राजधानी दिल्लीत सोने स्वस्त झाले आहे. आज दिल्लीत सोन्याचा भाव 57,000 च्या खाली घसरला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने यासंदर्भात माहिती दिली आहे.

सोने-चांदी स्वस्त - दिल्ली सर्राफा बाजारात मंगळवारी सोन्याचा दर 105 रुपयांनी घसरून 56,780 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. तर गेल्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोन्याचा दर 56,885 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीची किंमतही 379 रुपयांनी घसरून 68,418 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली.

ग्लोबल मार्केटमधील भाव? - परदेशी बाजारात सोने घसरणीनंतर 1,913 डॉलर प्रति औंसवर आले आहे. तर चांदी तेजीसह 23.27 डॉलर प्रति औंसवर होती.

काय म्हणतात एक्सपर्ट? - मोतीलाल ओसवाल फायनांशिअल सर्व्हिसेसमध्ये कमोडिटी रिसर्च विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ नवनीत दमानी म्हणाले, बाजारातील व्यापाऱ्यांना केंद्रीय बजेट 2022-23 मध्ये सोन्यावरील आयात शुल्कात कमी करण्यात येईल, अशी आशा आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात आम्ही आधिकृत घोषणेची वाट पाहत आहोत, असेही ते म्हणाले.

जाणून घ्या आपल्या शहरातील रेट - आपण घरबसल्याही सोन्याचा दर चेक करू शकतात. इंडियन बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशननुसार आपण केवळ 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन दर जाऊन घेऊ शकतात. आपण ज्या क्रमांकावरून मेसेज करता त्याच क्रमांकावर आपल्याला मैसेज येईल.