Gold Price: सोन्याच्या दरात घसरण! जाणून घ्या, आजचा 22 कॅरेटचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 02:47 PM2021-10-11T14:47:37+5:302021-10-11T15:07:01+5:30

Gold Silver Price Today 11th October 2021: सोमवारी सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली. तर बुलियन मार्केटमघ्ये चांदीच्या दरात तेजी दिसून आली.

Gold Silver Price Today 11th October 2021: सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली. तर बुलियन मार्केटमघ्ये चांदीच्या दरात तेजी दिसून आली.

सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 14 रुपयांनी स्वस्त झाली झाली असून 46966 रुपयांवर ट्रेड करताना दिसत आहे. बुलियन मार्केटमध्ये 22 कॅरेट गोल्ड रेट 43021 रुपयांजवळ आला आहे. तर चांदी दर 295 रुपयांनी वाढून 61375 रुपये झाला आहे.

कमकुवत जागतिक संकेतांमुळे सोमवारी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्या. MCX वर गोल्ड फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्ट 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 46,937 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61,737 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवसाय करत आहे. दरम्यान, सोन्याची किंमत अजूनही सप्टेंबरच्या अखेरीस 45,700 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खालच्या पातळीपेक्षा खूप जास्त आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव स्थिर होते. सोन्याची स्पॉट किंमत 1,755.83 डॉलर प्रति औंस होती. या आठवड्यात यामध्ये 0.3 टक्क्यांनी कमी झाली आहे. डॉलर इंडेक्सचा एक वर्षाचा उच्चांक गाठत असल्याने सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे.

मजबूत डॉलरमुळे इतर चलनांमध्ये सोने खरेदीची किंमत वाढते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, नोव्हेंबरमध्ये बॉण्ड खरेदीमध्ये कपात होऊ शकते. मात्र, हे सप्टेंबरच्या रोजगार डेटावर अवलंबून असेल.

गुड रिटर्न्स (Good Returns)वेबसाईटवर नजर टाकली तर आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 ग्रॅमवर ​​4,694 रुपये, 8 ग्रॅमवर ​​37,552, 10 ग्रॅमवर ​​46,940 आणि 100 ग्रॅमवर ​​4,69,400 रुपये आहे. जर तुम्ही प्रति 10 ग्रॅम पाहिले तर 22 कॅरेट सोने 45,940 वर विकले जात आहे.

जर तुम्ही प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव पाहिले तर दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,060 आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,260 आहे. मुंबईत 22 कॅरेट सोने 45,940 आणि 24 कॅरेट सोने 46,940 वर चालत आहे.

कोलकातामध्ये 22 कॅरेट सोने 46,400 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोने 49,100 रुपये आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 44,190 रुपये आणि 24 कॅरेटची किंमत 48,210 रुपये आहे. हे दर 10 ग्रॅम सोन्याचे आहेत.

तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.