सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:43 IST2025-12-26T14:32:57+5:302025-12-26T14:43:09+5:30

या वर्षात चांदी तब्बल १,४६,०८३ रुपयांनी वधारली आहे...

सध्या बाजारात सोन्या-चांदीचे दर अक्षरशः आकाशाला भिडले आहेत. आज पुन्हा सोन्या-चांदीच्या किंमतीने एक नवा इतिहास रचला आहे. सोने-चांदी आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर (All Time High) पोहोचले आहेत.

चांदीचा भावात आज एका झटक्यात १३,११७ रुपयांची वधारला. बाजार खुला होताच चांदी २,३२,१०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. जीएसटीचा विचार करता, चांदी २,३९,०६३ रुपये प्रति किलोवर गेली आहे.

बुधवारी चांदी जीएसटीशिवाय २,१८,९८३ रुपयांवर होती. महत्वाचे म्हणजे, या वर्षात चांदी तब्बल १,४६,०८३ रुपयांनी वधारली आहे.

सोन्याचा विचार करता, सोन्याच्या दरातही प्रति १० ग्रॅम १,२८७ रुपयांची वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर १३,७,९१४ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर खुला झाला.

जीएसटीसह ग्राहकांसाठी हा दर १,४२,०५१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. या वर्षात आतापर्यंत सोन्याचा दर तब्बल ६२,१७४ रुपयांनी वधारला आहे.

कॅरेटनिहाय आजचे सुधारित दर (विना जीएसटी) असे - आज २३ कॅरेट सोन्याचा दर १,३७,३६२ रुपये आहे हा दर जीएसटीसह १,४१,४८२ रुपयांवर जातो. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,२६,३२९ रुपयांवर आहे, जो जीएसटीसह १,३०,११८ रुपयांवर जातो.

याशिवाय, १८ कॅरेट सोन्याचा दर १,०३,४३६ रुपये एवढा आहे. जीएसटीचा विचार करता तो, १,०६,५३९ रुपये होतो. तसेच, १४ कॅरेट सोने ८०,६८० रुपयांवर आहे. हा दर जीएसटीसह ८३,१०० रुपयांवर जातो.

हे दर आयबीजेए (IBJA) द्वारे जारी करण्यात आले आहेत. यांत मेकिंग चार्जेस जोडण्यात आलेले नाहीत.