गौतम अदानींचा मुलगा जीतच्या लग्नाचं आमंत्रण कोणाला? ३०० जणांची यादी पाहून विश्वास नाही बसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:20 IST2025-02-07T15:17:23+5:302025-02-07T15:20:18+5:30
Gautam Adani Son Wedding: गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी याच्या विवाह सोहळ्याला कोण-कोण हजेरी लावणार? याची उत्सुकता देशातील प्रत्येकाला आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांचा विवाह दिवा शाह यांच्यासोबत पार पडणार आहे. दोघांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा होती.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या विवाहाप्रमाणे भव्यदिव्य विवाह सोहळा असेल अशी सर्वांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात हा विवाह सोहळा मर्यादीत पाहुण्यांमध्ये पार पडणार आहे.
या लग्नसोहळ्याला परदेशातील कोणते बडे सेलिब्रिटी येणार आहेत, अशीही चर्चा सुरू आहे. पण खुद्द गौतम अदानी यांनीच या लग्नसोहळ्यात कुटुंबातील मित्र आणि जवळचे नातेवाईक सहभागी होणार असल्याचे सांगून यावर पडदा टाकला.
अदानींच्या कौटुंबिक मित्रांच्या यादीत कोणत्या नशीबवान लोकांना स्थान मिळाले हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. मात्र, या लग्नात सेलिब्रिटींचा मेळावा होणार नसल्याचे अदानी कुटुंबाने आधीच स्पष्ट केलं आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार. या लग्नासाठी ३०० पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. लग्नाच्या पाहुण्यांच्या या यादीमध्ये वर जीत अदानी यांच्या समाजकार्यातून घडलेल्या लोकांचाही समावेश आहे. यामध्ये दिव्यांग, कारागीर आणि विणकर यांनाही या शाही विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
अहमदाबादमध्ये दोन ठिकाणी जीत अदानी यांच्या लग्नसोहळ्याशी संबंधित विविध कार्यक्रमांची तयारी सुरू आहे. यापैकी एक म्हणजे अदानी कुटुंबाचे निवासस्थान शांतीवन आहे. ४०० कोटी रुपये किंमत असलेले हे निवासस्थान एखाद्या महालापेक्षा कमी नाही. दुसरे ठिकाण शांतीग्राम आहे, जे अहमदाबादमधील अदानी कुटुंबाची टाऊनशिप आहे.