FASTag: 'वन व्हेईकल, वन फास्टॅग' उपक्रमाची अंतिम मुदत वाढू शकते; NHAI मार्च अखेरपर्यंत वाढवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 11:57 AM2024-02-29T11:57:42+5:302024-02-29T12:13:31+5:30

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने 'एक वाहन, एक फास्टॅग' उपक्रमाचे पालन करण्याची अंतिम मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

पेटीएम FASTag वापरकर्त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 'एक वाहन, एक फास्टॅग' उपक्रमाचे पालन करण्याची अंतिम मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली.

NHAI ने यापूर्वी १ मार्चपासून 'एक वाहन, एक फास्टॅग' उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव दिला होता.

"पेटीएम संकटाच्या पार्श्वभूमीवर, फास्टॅग वापरकर्त्यांना एक वाहन-एक फास्टॅग मानकावर स्थलांतरित करण्यासाठी अजुनही वेळ वाढवून दिला जाऊ शकतो.

इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि टोल प्लाझावर सेट करण्यासाठी, NHAI ने 'एक वाहन, एक फास्टॅग' उपक्रम सुरू केला आहे. याचा उद्देश एकापेक्षा जास्त वाहनांसाठी एक फास्टॅग वापरणे किंवा एका विशिष्ट वाहनाला अनेक फास्टॅग जोडणे आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना तसेच पेटीएम पेमेंट्स बँक लि. व्यापाऱ्यांना १५ मार्चपर्यंत त्यांची खाती इतर बँकांमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

RBI ने असेही म्हटले आहे की, PPBL ग्राहकांना त्यांच्या खात्यातून बचत बँक खाती, चालू खाती, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड्स यासह त्यांच्या खात्यांमधून १५ मार्चनंतरही त्यांच्या उपलब्ध शिल्लकपर्यंत कोणत्याही निर्बंधाशिवाय रक्कम काढण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिली जाईल.

Fastagवर, आरबीआयचे FAQ असे नमूद आहे की ,उपलब्ध शिल्लक उपलब्ध होईपर्यंत त्याचा वापर टोल भरण्यासाठी केला जाऊ शकतो.

१५ मार्च २०२४ नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेल्या FASTag मध्ये पुढील निधी किंवा टॉप-अपला परवानगी दिली जाणार नाही, असंही यात म्हटले आहे.

सुमारे ९८ टक्के प्रवेश दर आणि ८ कोटी पेक्षा जास्त वापरकर्त्यांसह, FASTag ने देशातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीमध्ये क्रांती केली आहे.

फास्टॅग ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे जी NHAI द्वारे चालवली जाते. हे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञान वापरते, यामुळे टोल पेमेंट थेट प्रीपेड किंवा बचत खात्यातून किंवा थेट टोल मालकाकडून करता येते.