1 / 6 खासगी पीएफ ट्रस्ट चालवणाऱ्या कंपन्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आता नवीन आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. 2 / 6नव्या नियमांनुसार, कोणतेही खासगी पीएफ ट्रस्ट ईपीएफओने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा २ टक्क्यांहून अधिक व्याज कर्मचाऱ्यांना देऊ शकणार नाहीत. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.3 / 6काही खासगी ट्रस्ट, जिथे सभासदांची संख्या अत्यंत कमी आहे, तिथे ३४ टक्क्यांसारखा अवाढव्य व्याजदर दिला जात होता, असे ‘ईपीएफओ’च्या निदर्शनास आले होते. अशा परतावा भविष्यात आर्थिक जोखीम निर्माण करू शकतो. हे टाळण्यासाठी ‘ईपीएफओ’ने आता व्याजावर मर्यादा आणली आहे.4 / 6ईपीएफओ’ने दरवर्षी होणाऱ्या अनिवार्य ऑडिटच्या नियमात बदल केला. ‘रिस्क-बेस्ड’ (जोखीम-आधारित) सिस्टिम लागू केली जाईल. 5 / 6ज्या कंपन्या सर्व नियमांचे पालन करत आहेत, त्यांना दरवर्षी ऑडिट करण्याची गरज भासणार नाही. 6 / 6ट्रस्ट बंद करायची असेल तर... जर एखादी कंपनी स्वतःहून ट्रस्ट बंद करू इच्छित असेल, तर तिला वर्तमानपत्रात नोटीस द्यावी लागेल आणि सर्व खाती ‘ईपीएफओ’कडे हस्तांतरित करावी लागतील.