लाखो पेन्शनधारकांसाठी खुशखबर! सरकारने सुरू केली खास सुविधा, आता खात्यात काही मिनिटांत पैसे येणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 15:37 IST2022-08-01T15:31:03+5:302022-08-01T15:37:29+5:30
EPFO Latest News: आता तुम्ही तुमचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (digital life certificates) काही मिनिटांत सबमिट करू शकता.

नवी दिल्ली : देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने देशातील 73 लाख पेन्शनधारकांसाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे आता तुम्ही तुमचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (digital life certificates) काही मिनिटांत सबमिट करू शकता.
पेन्शनधारकांच्या सुविधा लक्षात घेऊन केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी (Face Authentication Technology) सुरू केले आहे.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी माहिती दिली की, आता पेन्शनधारक डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (digital life certificates) दाखल करण्यासाठी चेहरा ओळखण्याच्या सुविधेची (face recognition facility) मदत घेऊ शकतात.
दरम्यान, वृद्धापकाळामुळे, अनेक वेळा पेन्शनधारकांना त्यांचे बायोमेट्रिक्स जुळवण्यात अडचणींचा सामना करावा लागतो, हे लक्षात घेऊन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
पेन्शनधारकांसाठी फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी सुरू करण्यात आल्याचे कामगार मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. दरम्यान, पेन्शन मिळवण्यासाठी दरवर्षी प्रत्येकाला लाइफ सर्टिफिकेट दाखल करावे लागत होते. पेन्शनधारक जीवत असण्याचा पुरावाही या सर्टिफिकेटद्वारे दिला जातो.
यासोबतच ईपीएफओच्या (EPFO) कर्मचाऱ्यांना या नवीन सुविधा चालवण्यासाठी प्रशिक्षणाची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. या प्रशिक्षण धोरणाद्वारे कर्मचारी आणि EPFO अधिकाऱ्यांना या ऑनलाइन टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
यासाठी येत्या 8 दिवसांत EPFO च्या सुमारे 14,000 कर्मचाऱ्यांना या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी प्रशिक्षणाची सुविधा (Training Facility) दिली जाईल.