शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

EPFO : महत्त्वाची बातमी; EPF खातं आधार कार्डाशी लिंक न केल्यास होणार मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 3:57 PM

1 / 15
जर आपण नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्त्वाची आहे. ईपीएफओने भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी असलेल्या नियमांत काही बदल केले आहेत.
2 / 15
६ कोटींपेक्षा अधिक ईपीएफओ सदस्यांसाठी १ जूनपासून काही नियम बदलले आहेत. ईपीएफओनं सोशल सिक्युरिटी कोड २०२० अंतर्गत हा निर्णय घेतला आहे.
3 / 15
या नियमांतर्गत ज्या खातेधारकांनी १ जून नंतर आपल्या खात्याशी आधार कार्ड लिंक केलं नाही त्यांचं इलेक्ट्रॉनिक चालान कम रिटर्न म्हणजेच ECR भरता येणार नाही.
4 / 15
यामुळे खातेधारकांना पीएफ खात्यात कंपनीकडून जो शेअर दिला जातो तो मिळण्यात अडचणी येणार आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या खात्यात केवळ कर्मचाऱ्यांचाच शेअर दिसेल.
5 / 15
ईपीएफओने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये कर्मचाऱ्यांना नियुक्त करणाऱ्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे आणि कर्मचार्‍यांच्या खात्याला आधार क्रमांकाशी जोडण्यास सांगितलं आहे.
6 / 15
जर यानुसार तुमचा आधार क्रमांक तुमच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्याशी जोडला न गेल्यास एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशनवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
7 / 15
या नियमांतर्गत खातेधारकांचा यूएएनदेखील आधार व्हेरिफाईड असणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचं खातं आधार कार्डाशी लिंक करून घ्या.
8 / 15
त्यानंतर युएएनदेखील व्हेरिफाय करून घ्या. यामुळे कंपनीकडून मिळणाऱ्या त्यांच्या शेअरमध्ये कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.
9 / 15
आधार कार्ड लिंक करण्यासाठी सर्वप्रथम EPFO पोर्टल epfindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा.
10 / 15
'Online Services' ऑप्शनमध्ये 'e-KYC portal' वर जा आणि Link UAN Aadhaar वर क्लिक करा.
11 / 15
या ठिकाणी तुमचा UAN नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
12 / 15
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी आणि १२ अंकांचा Aadhaar Card क्रमांक त्या ठिकाणी टाका.
13 / 15
त्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्या आधार तपशीलासाठी आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या ईमेलसाठी नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी जनरेट करा.
14 / 15
ईपीएफओ तुमच्या आधार क्रमांकाच्या लिंकींगसाठी ऑथेन्टिकेशनद्वारे तुमच्या कंपनीला संपर्क करेल.
15 / 15
त्यानंतर तुमचा रिक्रुटर ईपीएफ खात्याशी जोडण्यासाठी प्रक्रिया करेल त्यानंतर तुमचा आधार क्रमांक ईपीएफ खात्याशी जोडला जाईल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीIndiaभारतEmployeeकर्मचारीMONEYपैसाAdhar Cardआधार कार्ड