Post Office च्या या स्कीममध्ये वर्षाला कमवा १,११,००० रुपये, जाणून घ्या कोणती आहे योजना? By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:13 AM 2024-04-15T09:13:00+5:30 2024-04-15T09:19:37+5:30
या सरकारी योजनेत तुम्ही एकदा पैसे जमा करता आणि तुम्हाला त्यानंतर ५ वर्षांसाठी दर महिन्याला पैसे मिळतील. Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (एमआयएस), तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळतं. भारत सरकारची ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जात आहे. मासिक उत्पन्न योजना योजनेअंतर्गत, तुम्ही एकदा पैसे जमा करता आणि तुम्हाला त्यानंतर ५ वर्षांसाठी दर महिन्याला पैसे मिळतील.
पोस्टाच्या योजना या जोखिममुक्त असतात. यामध्ये तुम्हाला परताव्याची हमीही मिळते. जर तुम्हाला घरी बसून नियमित उत्पन्न हवं असेल तर तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवलेले पैसे तुम्हाला ५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर मिळतील.
जर तुम्हाला एमआयएस स्कीमद्वारे दरमहा ९२५० रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला संयुक्त खात्याद्वारे १५ लाख रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही या योजनेत १५ लाख रुपये गुंतवले तर ७.४ टक्के व्याजदराने तुम्हाला पाच वर्षांसाठी ९२५० रुपये मासिक उत्पन्न मिळेल. म्हणजेच वार्षिक १,११,००० रुपये मिळतील.
जर तुमचं एक खातं असेल आणि एकट्या व्यक्तीनं गुंतवणूक केली असेल तर तुम्ही ९ लाख रुपये गुंतवू शकाल. यातून तुम्हाला ५५५० रुपये मासिक उत्पन्न मिळेल. ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट परत मिळेल.
एमआयएस खातं किमान १००० रुपये आणि १००० च्या पटीत उघडता येतं. एमआयएस योजनेअंतर्गत सिंगल खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात १५ लाख रुपये गुंतवता येतात.
यावर सरकार दरवर्षी ७.४ टक्के दरानं व्याज देत आहे. दर महिन्याला तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीनुसार मासिक उत्पन्न मिळेल. यामध्ये जर तुम्ही पाच वर्षापूर्वी पैसे काढले तर तुमच्या मूळ रकमेतून १ टक्के रक्कम कापली जाईल.
व्याज - खातं उघडण्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर आणि मॅच्युरिटीवर व्याज दिलं जातं. जर खातेधारक प्रत्येक महिन्याच्या व्याजाचा दावा करत नसेल, तर त्यावर कोणतंही अतिरिक्त व्याज दिलं जात नाही. यावर मिळणाऱ्या व्याजावर करही आकारला जातो.