भारीच! रिस्क न घेता असे दुप्पट करा पैसे, व्हाल करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 12:03 PM2023-07-23T12:03:04+5:302023-07-23T12:13:04+5:30

तुम्हाला कोणतीही रिस्क न घेता पैसा गुंतवायचा असल्यास सरकारी बचत आणि गुंतवणूक योजना तुमच्यासाठी अधिक चांगल्या ठरू शकतात. या योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे तुमचे पैसे बाजारातील जोखमीपासून पूर्णपणे सुरक्षित राहतात. यासोबतच तुम्हाला अधिक चांगल्या व्याजदराने परतावादेखील मिळतो. या योजनांचा महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना समान लाभ होतो. या योजना नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊ... चंद्रकांत दडस, उपसंपादक.

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना- पोस्टाच्या या योजनेत आपल्याला प्रत्येक महिन्याला व्याज मिळते. यामध्ये तुम्हाला कमाल ९ लाख रुपये गुंतवता येतात. योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षे असून, यात ७.४ टक्के दराने व्याज मिळते.

राष्ट्रीय बचत टाइम डिपॉझिट- पोस्टाच्या या योजनेत १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. यात तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकता. त्यावर ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.

वरिष्ठ नागरिक बचत योजना- या योजनेत कमाल ३० लाख रुपये गुंतवता येतात. यात ८० सी अंतर्गत कर सवलतही मिळते. तिमाही व्याजदर ८.२ टक्के आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र- या योजनेत पैसे जमा करण्याची मर्यादा नाही. यामध्ये ७.७ टक्के व्याज मिळते.

पीपीएफ - पोस्टाच्या या योजनेचा मॅच्युरिटी पिरीएड १५ वर्षांचा असून तो आणखी ५ वर्षांनी वाढवता येतो. वार्षिक किमान दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. या योजनेत ७.१ टक्के व्याज मिळते.

सुकन्या समृद्धी योजना- ही योजना खास मुलींसाठी आहे. मुलगी १० वर्षांची होईपर्यंत या योजनेतील गुंतवणूक सुरू करता येते. गुंतवणुकीवर कर सवलतही मिळते. यावर वार्षिक ८ टक्के इतके व्याज मिळते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र - यामध्ये २ वर्षांसाठी २ लाख रुपये गुंतवणूक करता येते. यावर ७.५ टक्के इतके व्याज मिळते.

किसान विकास पत्र - या याजनेत वार्षिक ७.५ टक्के व्याज मिळते. ही योजना खास शेतकऱ्यांना लक्ष ठेवून सुरू करण्यात आली असली तरी सामान्य गुंतवणूकदारही यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

आरडी बचत योजना यामध्ये महिना किमान १०० रुपये गुंतवता येतात. याचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे. यामध्ये दर तीन महिन्यांनी व्याज मिळते.

पोस्ट ऑफिस बचत खाते - यामध्ये किमान ५०० रुपये गुंतवणूक करून खाते सुरू करता येते. यामध्ये गुंतवणुकीची मर्यादा नाही. यामध्ये आपल्याला वार्षिक ४ टक्के दराने व्याज मिळते.