कमाईची संधी सोडू नका, या शेअर्समध्ये होऊ शकते २० टक्क्यांपर्यंत वाढ; पाहा नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 10:22 AM2023-07-03T10:22:28+5:302023-07-03T10:36:56+5:30

Stock Market Investment : शेअर बाजारात गेल्या आठवड्यात मोठी तेजी पाहायला मिळाली होती.

Stock Market Investment : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजारानं ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. विदेशी गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली होती आणि कायमही ठेवली होती.

दरम्यान, चांगल्या संकेतांमुळे विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली होती. दरम्यान, आपली गुंतवणूक कायम ठेवावी की नफा काढून घ्यावा अशा विचारात किरकोळ गुंतवणूकदार आहेत.

शेअर बाजाराच्या या तेजीदरम्यान टॉप १० कंपन्यांचं संयुक्त मूल्य गेल्या आठवड्यात १.८८ लाख कोटी रुपयांनी वाढलं. एचडीएफसी बँक आणि टीसीएसमध्ये सर्वाधिक तेजी आली. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स १७३९.१९ किंवा २.७६ टक्क्यांनी वाढला होता.

शेअर बाजारात आलेल्या तेजीदरम्यान १० मुख्य कंपन्यांचं बाजार मूल्य १,८८,०५०.८२ कोटी रुपयांनी वाढलं. एचडीएफसी बँकेचं मूल्यांकन ३२,६००.१९ कोटी रुपयांनी वाढून ९,५१,५८४.३६ कोटी रुपये झालंय. तर टीसीएसच्या मूल्यांकनात ३०,३८८.४३ कोटी रुपयांची वाढ झालीये. कंपनीचं बाजार मूल्य १२,०७६६९.९१ कोटी रुपये झालंय.

इन्फोसिसचं बाजारमूल्य २८,८६२.३८ कोटी रुपयांनी वाढून ५,५४,०९१.२७ कोटी रुपये आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य २३,९८४.२८ कोटी रुपयांनी वाढून १७,२५,७०४.६० कोटी रुपये झालंय.

प्रमुख १० कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य सर्वाधिक वाढलं. शेअर बाजारात पुढील काळातही तेजी राहण्याचे संकेत मिळत आहेत. यादरम्यान तज्ज्ञांनी असे काही शेअर्स सांगितले आहेत, ज्यात येत्या काळात २० टक्क्यांपर्यंत तेजी दिसून येऊ शकते. नफा कमावण्यासाठी तुम्ही हे शेअर्स तज्ज्ञांच्या सल्ला घेऊन आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील करू शकता.

तज्ज्ञांनुसार कर्नाटक बँकेचा शेअर २४० रुपयांपर्यंत जाऊ शकतो असं सांगण्यात आलंय. याला त्यांच्याकडून बाय रेटिंग देण्यात आलंय. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीये. हा शेअर १९०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीये.

याशिवाय ज्युपिटर वॅगन्सच्या शेअरमध्येही तेजी दिसून येतेय. यात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. झायडस लाईफसायन्सेसच्या स्टॉकमध्येही २५ ते ३० टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. याशिवाय कोटक सिक्युरिटीजवरही तज्ज्ञांनी बाय रेटिंग दिलंय. तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, झोमॅटो, स्टार हेल्थ यांच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीये.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.)