तुम्हाला तुमच्या EPF खात्यातून रक्कम काढायची आहे?; पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 12:13 PM2021-06-20T12:13:15+5:302021-06-20T12:18:28+5:30

Provident Fund : तुम्हाला तुमच्या खात्यातून पूर्ण किंवा अंशत: रक्कम काढता येऊ शकते. पाहा प्रक्रिया

जर तुम्हाला PF खात्यातू अंशत: किंवा पूर्ण रक्कम काढायची असेल तर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक आवश्यक असतो. परंतु तुमच्याकडे युएएन क्रमांक नसला तरी तुमच्या खात्यातून पैसे काढणं शक्य आहे.

अशा प्रकारे तुमच्या पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो आणि नंतर तो तुम्हाला EPFO कार्यालयात जमा करावा लागतो.

परंतु या प्रक्रियेमध्ये तुम्हाला EPFO कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू शकतात. परंतु तुम्हाला यापासून वाचायचं असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईनदेखील अर्ज करू शकता.

ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पैसे काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या संकेतस्थळावर जावं लागेल.

त्यानंतर तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा एन्टर करून लॉग इन करा. त्यानंतर Manage या ऑप्शनवर क्लिक करा.

त्या ठिकाणी असलेल्या KYC ऑप्शनवरील सर्व माहिती तपासून पाहा आणि ऑनलाईन सर्व्हिसेसवर क्लिक करा. त्यानंतर एक ड्रॉप मेन्यू ओपन होईल.

यामध्ये Claim या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा क्लेम फॉर्म सबमिट करण्यासाठी Proceed For Online Claim वर क्लिक करा.

त्यानंतर ‘I Want To Apply For’ मध्ये जा. यामध्ये full EPF Settlement, EPF Part withdrawal (loan/advance) किंवा pension withdrawal ऑप्शनची निवड करा.

यात फॉर्म भरल्यानंतर ५ ते १० दिवसांमध्ये तुमच्या ईपीएफओशी रजिस्टर असलेल्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील.

यानंतर तुमच्या माहितीसाठी मोबाईलवर एक SMS पाठवला जाईल. जर तुमचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तर तुम्ही ऑनलाईन पैसे काढण्यासाठी अर्ज करू शकता.