फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 20:31 IST2025-09-06T20:27:03+5:302025-09-06T20:31:15+5:30
कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८०.२७ आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ४१.९७ रुपये आहे.

आपल्या गुंतवणूकदारांना ८ बोनस शेअर्स देणारी कंपनी डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडच्या शेअरवर सध्या सर्वांचे लक्ष आहे. कंपनीला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे.
बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीला ३ कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. कंपनीने ५ सप्टेंबर २०२५ रोजी या कामाच्या ऑर्डरसंदर्भात माहिती दिली.
काय आहे काम? - कंपनीने, एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, तिला कमलांग स्मॉल हायड्रो पॉवर प्रोजेक्ट (३ x ८.२० मेगावॅट) मध्ये इंजिनिअरिंग कंसल्टन्सी सर्व्हिसेसचे काम मिळाले आहे. कंपनीला हे काम ३६ महिन्यांत पूर्ण करायचे आहे. या कामाच्या ऑर्डरचे मूल्य ३,००,००,००० रुपये एवढे आहे.
कंपनीची एका वर्षातील कामगिरी? - गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअरची किंमत १२ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. मात्र, एका वर्षाचा विचार करता, हा शेअर १७ टक्क्यांनी घसरला आहे.
शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट दिसून आले. ५ टक्क्यांच्या घसरणीनंतर, कंपनीच्या शेअर्सची किंमत बीएसईवर ५४.२२ रुपयांच्या पातळीवर होती.
महत्वाचे म्हणजे, कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८०.२७ आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ४१.९७ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ५६.२३ कोटी रुपये आहे.
२ वर्षांत १०२ टक्क्यांची तेजी - या शेअरमध्ये गेल्या दोन वर्षांत १०२ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. याच वेळी, डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीत ३ वर्षात ५३७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर्समध्ये एक्स-बोनस ट्रेडिंग झाले. तेव्हा कंपनीने ५ शेअर्सवर ८ बोनस शेअर दिले. कंपनीने गेल्या महिन्यातच एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग केले. तेव्हा कंपनीने एका शेअरवर १३ पैशांचा लाभांश दिला.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)