Diwali: 'डिजिटल गोल्ड'ने यंदाची दिवाळी, फक्त 1 रुपयांत करा सोनं खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:35 PM2022-10-20T12:35:02+5:302022-10-20T16:12:01+5:30

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून धनत्रोयदशी आणि दिवाळीच्या पाडव्याला सोनं खरेदी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यादिवशी शुभ मुहूर्त मानून सोनं खरेदी करण्यात येतं. अनेकजण गुंतवणूक करण्यासाठीही सोन्याची खरेदी करतात.

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून धनत्रोयदशी आणि दिवाळीच्या पाडव्याला सोनं खरेदी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यादिवशी शुभ मुहूर्त मानून सोनं खरेदी करण्यात येतं. अनेकजण गुंतवणूक करण्यासाठीही सोन्याची खरेदी करतात.

सध्या डिजिटल युगात प्रत्येक सणावाराला ऑनलाईन शॉपिंगचाही ट्रेंड सेट झाला आहे. कपडे, किराणा, स्वीट किंवा इतरही वस्तू ऑनलाईन पद्धतीने खरेदी केल्या जातात. ऑनलाईन सोनं खेरदीचाही नवीन ट्रेंड सुरू झाला आहे

ऑनलाइन सोनं म्हणजेच डिजिटल गोल्ड खरेदी करणाऱ्यांच्याही संख्येत वाढ झाली आहे. डिजिटल गोल्ड? नेमकं काय हे तुम्हाला माहिती आहे का. त्यात कशी गुंतवणूक करता येते, या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळतील.

डिजिटल सोनं खरेदी किंवा डिजिटल गोल्डमधील गुंतवणूक ही २४ कॅरेट सोन्यातील गुंतवणुकीचा आभासी प्रकार आहे. त्यासाठी, प्रत्यक्ष सोन्याची गरज नसते.

सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तुम्ही ऑनलाइन पेमेंट आणि युपीआयच्या माध्यमातून डिजिटल गोल्ड खऱेदी करु शकता. विक्रेता या व्हावहारासाठी एक डिजिटल चालान जारी करते. ज्या कंपनीतून तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करता, त्या कंपनीच्या तिजोरीत हे सोनं ठेवलं जातं.

डॉलर आणि मोठी मुद्रांकस्थिती, शेअर बाजार आणि रुपयांवर वाढत असलेल्या दबावामुळे गुंतवणूकदारांनी आपले पैसे डिजीटल सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरू केले आहे.

गोल्ड ईटीएफ, गोल्ड बॉन्ड और गोल्ड फंड (Gold ETFs, Gold Bonds, Gold Funds)। या तीन पद्धतीद्वारे डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करता येते.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bonds) हा सरकार समर्थित आहे, ज्याची किंमत सोन्याच्या वजनाच्या हिशोबाने घेतली जाते. 1 ग्राम सोना बॉन्डच्या एका चलनाच्या बरोबरीचा असतो. या बॉन्डधील गुंतवणूक सोन्याच्या किमतींच्या आधारावर होते.

डिजिटल सोन्यातील गुंतवणूक १ रुपयानेही करता येते, तुम्ही घरी बसून आरामात डिजिटल सोनं खरेदी करु शकता किंवा विक्रीही करु शकता. कुठल्याही त्रासाशिवाय आपणास सहजच पैसे मिळतात.

बहुतांश प्लॅटफॉर्मवर डिजिटल सोन्यातील गुंतवणुकीसाठी २ लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे. काही क्लिकद्वारे आपण हे डिजिटल सोनं खरेदी करू शकता.