Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 08:54 IST2025-12-31T08:34:04+5:302025-12-31T08:54:12+5:30

रिझर्व्ह बँकेनं यावर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात केल्यामुळे तो ५.२५ टक्क्यांवर आला आहे. यानंतर बँकांनी आपल्या अनेक स्कीमवरचे व्याजदर कमी केलेत. परंतु युनियन बँक मात्र अजूनही उत्तम व्याज देत आहे.

Union Bank of India Saving Schemes: रिझर्व्ह बँकेनं यावर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात केल्यामुळे तो ५.२५ टक्क्यांवर आला आहे. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाच्या व्याजासोबतच एफडी (मुदत ठेव) वरील व्याजातही घट होते.

असं असूनही, युनियन बँक ऑफ इंडिया सध्या आपल्या एफडी योजनांवर आकर्षक व्याज देत आहे. या बँकेच्या एका विशेष योजनेत केवळ १ लाख रुपये जमा करून गुंतवणूकदार २२,२३९ रुपयांपर्यंत निश्चित व्याज मिळवू शकतात.

युनियन बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक एफडी खात्यांवर २.७५ टक्क्यांपासून ७.०५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. या बँकेत तुम्ही किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी करू शकता. बँक आपल्या ४०० दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर सामान्य नागरिकांना ६.३० टक्के व्याज देत आहे.

तर ज्येष्ठ नागरिकांना ६.८० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.०५ टक्के इतका सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहे. तसंच, ३ वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना ६.०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ६.५० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ६.७५ टक्के व्याज मिळत आहे.

जर तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ३ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम पुढीलप्रमाणे असेल. सामान्य नागरिकांना १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ३ वर्षांनंतर एकूण १,१९,५६२ रुपये मिळतील, ज्यामध्ये १९,५६२ रुपये व्याजाचा समावेश असेल.

ज्येष्ठ नागरिक: ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी १,२१,३४१ रुपये मिळतील, ज्यामध्ये २१,३४१ रुपये निश्चित व्याज असेल.

अति ज्येष्ठ नागरिक: अति ज्येष्ठ नागरिकांच्या १ लाख रुपयांच्या ठेवीवर ३ वर्षांनंतर एकूण १,२२,२३९ रुपये मिळतील, ज्यामध्ये २२,२३९ रुपये इतका जबरदस्त व्याज परतावा समाविष्ट असेल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)