Post Office मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, सोबत सरकारची गॅरेंटीही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 09:43 IST2026-02-16T08:52:00+5:302026-02-16T09:43:00+5:30
Post Office Saving Schemes: बचत खात्यांवर अधिक परतावा देण्याच्या बाबतीत भारतीय पोस्ट ऑफिसनं मोठ्या बँकांना मागे टाकलं आहे. पाहा कोणती आहे ही स्कीम ज्यात मिळतोय मोठा परतावा.

Post Office Saving Schemes: बचत खात्यांवर अधिक परतावा देण्याच्या बाबतीत भारतीय पोस्ट ऑफिसनं मोठ्या बँकांना मागे टाकलं आहे. एकीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर सर्व बँकांनी त्यांच्या एफडी योजनांवरील व्याजदर कमी केले आहेत.

तर दुसरीकडे पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनांवर अजूनही पूर्वीप्रमाणेच भरघोस व्याज मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही केवळ १ लाख रुपये जमा करून ४४,९९५ रुपयांचे निश्चित व्याज मिळवू शकता.

पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी खात्यांना 'टीडी' (टाईम डिपॉझिट) या नावानं ओळखलं जातं. हे खाते अगदी बँकांच्या एफडी खात्यासारखेच असते, ज्यामध्ये मॅच्युरिटीनंतर तुम्हाला निश्चित व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळते.

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे यावर थेट केंद्र सरकारचं नियंत्रण असतं, त्यामुळे तुम्हाला सरकारी गॅरंटीसह निश्चित व्याज तर मिळतंच, शिवाय तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतात.

सध्या पोस्ट ऑफिस १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के दराने व्याज देत आहे.

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या टीडी योजनेत १,००,००० रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एकूण १,४४,९९५ रुपये मिळतील, ज्यामध्ये ४४,९९५ रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश आहे. सध्याच्या काळात देशातील कोणतीही बँक ५ वर्षांच्या एफडी योजनेवर ७.५ टक्के व्याज देत नाही.

मात्र, गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत सर्व वयोगटातील ग्राहकांना सारखंच व्याज दिलं जातं. याउलट, बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत ०.५० टक्के अधिक व्याज मिळते आणि काही बँका ८० वर्षांवरील ग्राहकांसाठी आणखी जास्त व्याजदर ऑफर करतात.

















