शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ICICI च्या नेट बँकिंग ग्राहकांवर घोटाळे बाजांची नजर, पोलिसांकडून अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 2:05 PM

1 / 8
सायबर क्राइमच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याबाबत वेळोवेळी चेतावणीही दिली जाते. आता नव्या सायबर फसवणुकीची बातमी समोर येत आहे.
2 / 8
नव्या सायबर फसवणूकीत घोटाळेबाज ICICI बँकेच्या ग्राहकांना लक्ष्य करीत आहेत. याबाबत दिल्ली पोलिसांनी अलर्ट जारी केली आहे. नव्या घोटाळ्यात ICICI बँकेचे ग्राहक आपले लॉगिन डिटेल्स फेक ICICI बँकेच्या वेबसाइटवर अपलोड करतात.
3 / 8
त्यामुळे त्यांचे लॉगिन डिटेल्स घोटाळेबाजांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे हे घोटाळेबाज ग्राहकांची सहज फसवणूक करू शकतात. यासंदर्भात ग्राहकांना एक मेसेज पाठविण्यात आला आहे.
4 / 8
मेसेजमध्ये असे म्हटले आहे की, आपले केवायसी निलंबित (सस्पेंड) केले गेले आहे. हे त्वरित अपडेट करा. यासाठी एक लिंकही मेसेजमध्ये देण्यात आली आहे. ज्यावर आपल्याला केवायसी अपडेट करण्यास सांगितले जाते.
5 / 8
आता दिल्ली पोलिसांनी याबाबत अलर्ट दिला आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, ती वेबसाइट ब्लॉक करत आहे. या व्यतिरिक्त, ती इतर डिटेल्स देखील तपासत आहेत जेणेकरून ग्राहकांना या घोटाळ्यात अडकण्यापासून वाचविता येईल.
6 / 8
दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने प्रथमच अशा प्रकारच्या घोटाळ्यांबाबत इंटरनेट युजर्संना माहिती दिली नाही. तर अलीकडेच आणखी एक घोटाळा झाला होता, ज्यामध्ये फसवणूक करणारे ग्राहकाला केवायसीच्या समस्येमुळे नंबर सत्यापित (व्हेरिफाय) करण्यास सांगायचे.
7 / 8
ट्विटरवर यासंदर्भात काही सुरक्षा टिप्सदेखील देण्यात आल्या आहेत. ज्याद्वारे ग्राहक ऑनलाईन घोटाळ्यांपासून आपले संरक्षण करू शकतात.
8 / 8
दरम्यान, ग्राहकांनी कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळले पाहिजे. बँकिंग किंवा कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक डिटेल्स ऑनलाइन शेअर करू नये.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमICICI Bankआयसीआयसीआय बँकbankबँकCrime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइनSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस