Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:15 AM2024-05-27T10:15:48+5:302024-05-27T10:26:40+5:30

तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर, गुंतवणूक सतत आणि दीर्घकाळ चालू ठेवावी लागते. आता कमी पगारात किती बचत आणि गुंतवणूक करायची, तसंच कुठे गुंतवणूक करायची हा प्रश्न येतो. जाणून घेऊ याबाबत अधिक माहिती.

देशात असे अनेक लोक आहेत जे आपल्या घरापासून दूर येऊन नोकरी करतात, जेणेकरून ते आपल्या कुटुंबाला चांगलं भविष्य देऊ शकतील. त्यासाठी ते १५ ते २० हजार रुपये कमावून पैसान पैसा जमवतात. मात्र, एवढ्या कमी पगारातून मोठी रक्कम उभी करणं सर्वांनाच शक्य होत नाही. पण मनाशी ठरवलं तर काहीही अशक्य नाही.

आजकाल गुंतवणुकीचे असे पर्याय आहेत ज्यात तुम्ही कमी रक्कम गुंतवूनही मोठे पैसे जोडू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोट्यधीशही बनू शकता. पण ही गुंतवणूक सतत आणि दीर्घकाळ चालू ठेवावी लागते. आता एवढ्या कमी पगारात किती बचत आणि गुंतवणूक करायची, तसंच कुठे गुंतवणूक करायची हा प्रश्न येतो. जाणून घेऊ याबाबत अधिक माहिती.

महिन्याला २० हजार रुपये कमावत असाल तर एवढ्या पगारात बचत करून गुंतवणूक कशी करायची असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. याचं उत्तर असं आहे की, कोट्यधीश होण्याचं स्वप्न पाहिलं तर कमाई कितीही कमी असली तरी बचत आणि गुंतवणूक करावी लागते. बचत-गुंतवणुकीसाठी ७०:१५:१५ या सूत्राचा वापर करा.

७०:१५:१५ मध्ये, आपण आपल्या कमाईच्या ७० टक्के रक्कम आपल्या गरजा भागविण्यासाठी ठेवता, १५% रकमेसह इमर्जन्सी फंड तयार करा आणि १५% रक्कम गुंतवा. २०,००० रुपयांपैकी ७०% म्हणजे १४,००० रुपये. म्हणजे आपल्याला आपला सर्व खर्च १४,००० रुपयांसह भागवावा लागेल. इमर्जन्सी फंड आणि गुंतवणुकीसाठी १५-१५ टक्के म्हणजे ३०००-३००० रुपये ठेवावे लागतील.

आता प्रश्न असा आहे की, कोट्यधीश होण्यासाठी गुंतवणूक कुठे करायची? तर याचं उत्तर असं आहे की, तुम्ही ही गुंतवणूक एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. म्युच्युअल फंडातील सरासरी परतावा १२ टक्के आहे. तसेच कंपाउंडिंगचा ही फायदा होतो. अशा वेळी तुमचा पैसा झपाट्यानं वाढतो.

सलग ३० वर्षे एसआयपीच्या माध्यमातून दरमहा ३,००० रुपयांची गुंतवणूक केल्यास ३० वर्षांत तुम्ही एकूण १०,८०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. पण यावर १२ टक्के दरानं तुम्हाला ९५,०९,७४१ रुपये फक्त व्याजातून मिळतील. अशा प्रकारे ३० वर्षात तुम्ही १,०५,८९,७४१ रुपयांचे मालक व्हाल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)