Coronavirus: व्हॉट्सअपचं नवं फिचर, मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी 'सर्च आयकॉन'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 04:47 PM2020-04-07T16:47:35+5:302020-04-07T17:01:46+5:30

सोशल मीडियावर कोरोना व्हायरससंबंधी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियात लोकप्रिय असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने मेसेज फॉरवर्डिंगवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.

फेक बातम्या ओळण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून एका नवीन फिचरवर काम सुरू आहे. त्यामुळे, फॉरवर्ड झालेल्या मेसेजची सत्यता पडताळण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅप वेबमध्ये हे फिचर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपच्या काही अन्ड्रॉईड आणि IOS स्मार्टफोनमध्ये हे फिचर देण्यात येत आहे.

Wabetainfo ने एक फिचर स्क्रीनशॉट जारी केलं असून चॅट मेसेजसमोर एक सर्च आयकॉन दिसून येत आहे. केवळ फॉरवर्ड करण्यात आलेल्या मेसेजसमोरच हा आयकॉन दिसणार आहे.

व्हॉट्सअफ फिचर्संची माहिती पुरवणारी WAbetainfo या वेबसाईटच्या अहवालानुसार कंपनीकडून सर्च मेसेजचे फिचर जारी करण्यात आले आहे. त्यास, व्हॉट्सअॅप वेबच्या नवीन व्हर्जनमध्ये वापरता येईल.

ट्विटरवर हा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला असून अनेकांनी हा आयकॉन आपल्या डेस्कटॉपवर दिसत असल्याचं म्हटलंय. तर अनेकांनी अद्याप दिसत नसल्याचं सांगितलंय.

या फिचरच्या माध्यमातून सातत्याने फॉरवर्ड होत असलेल्या मेसेजची सत्यता पडताळण्यात येणार आहे. यावरुन तो मेसेज वैध ठरवता येईल.

या आयकॉनवर टॅप केल्यानंतर पुढील सूचनेनुसार तुम्ही गुगल सर्च इंजिनवर जाऊ शकता. तेथून हा मेसेज किती खरा आणि किती खोटा याचा अंदाज तुम्हाला लावता येईल.

एकंदरीत पूर्णपणे हे फिचर व्हॉट्सअॅपमध्ये जारी केल्यानंतर फेक न्यूज रोखण्यात मोठी मदत मिळेल. तर, व्हॉटअसपने फेक मेसेज फॉरवर्ड होऊ नये, यासाठीही उपाय केला आहे.