शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: कोरोना, लॉकडाऊनमुळे ६१ टक्क्यांनी घटले देशातील नव्या नोकऱ्यांचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 10:56 PM

1 / 17
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे देशातील विविध क्षेत्रातील नव्या नोकऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. नोकरी.कॉमने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मे महिन्यामध्ये भारतात नव्या नियुक्त्यांचे प्रमाण तब्बल 61 टक्क्यांनी घटले आहे. जाणून घेऊया कुठल्या क्षेत्रात किती नोकऱ्या कमी झाल्या.
2 / 17
या सर्वेनुसार देशातील महानगरांमध्ये नव्या नियुक्त्यांच्या प्रमाण मोठी घट झाली आहे . सर्वेमधील आकडेवारीनुसार कोलकात्यामध्ये नव्या नियुक्त्यांचे प्रमाण सर्वाधिक ६८ टक्क्यांनी घटले आहे. तर दिल्ली आणि मुंबईत नवनियुक्त्यांमध्ये अनुक्रमे ६७ टक्क्यांनी घट झाली आहे.
3 / 17
नवनियुक्त्यांमधील घटीचा दर हा वर्क एक्स्पिरियन्सनुसारही नोंद झालेला आहे. यामध्ये ०-३ ते वर्षे अनुभव असलेल्यांचा हायरिंग रेट सर्वात कमी नोंद झाला आहे. अहवालानुसार यामध्ये ६६ टक्के घट दिसून आली.
4 / 17
अनुभवाचा विचार केल्यास तरुण कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्राथमिक स्तर आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरतीमध्ये क्रमशः ६६ आणि ६२ टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. तर मध्यम व्यवस्थापन स्तरावर भूमिका बजावणाऱ्यांच्या प्रमाणात ५५ टक्क्यांनी घट झाली आहे. तर वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये ५० टक्क्यांनी घट नोंदवली गेली .
5 / 17
या सर्वेक्षणानुसार भारतात काही क्षेत्रातील नव्या नियुक्त्यांमध्ये ९१ टक्क्यांपर्यंत घट नोंदवली गेली आहे. यात हॉटेल आणि हवाई वाहतूक क्षेत्रांचा समावेश आहे.
6 / 17
कुठल्या क्षेत्रातील नवनियुक्त्यांमध्ये किती प्रमाणात घट झाली त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे
7 / 17
हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन, हवाई वाहतूक क्षेत्रातील नवनियुक्त्यांमध्ये ९१ टक्क्यांनी घट झाली.
8 / 17
रीटेल क्षेत्रात नवनियुक्त्यांचे प्रमाण ८७ टक्क्यांनी घटले.
9 / 17
अॉटो, एंसिलरी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या प्रमाणात ७६ टक्क्यांनी घट नोंदवली गेली.
10 / 17
अकाऊंटिंग, टँक्सेशन, फायनान्स क्षेत्रात नवनियुक्त्यांमध्ये ६९ टक्क्यांनी घट झाली.
11 / 17
बीपीओ, आयटीईएस, सीआरएम, ट्रान्सक्रिप्शन क्षेत्रात नवनियुक्त्या ६३ टक्क्यांनी घटल्या.
12 / 17
आयटी, हार्डवेअर क्षेत्रात नवनियुक्त्यांचे प्रमाण ५८ टक्क्यांनी घटले.
13 / 17
मेडिकल, हेल्थकेअर, रुग्णालयातील नवनियुक्त्यांमध्ये २० टक्क्यांनी घट नोंदवली गेली.
14 / 17
फार्मा, बायोटेक, क्लीनिकल रीसर्च क्षेत्रात नवनियुक्त्यांमध्ये ४८ टक्क्यांनी घट नोंदवली गेली.
15 / 17
आयटी-सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस क्षेत्रात नवनियुक्त्यांमध्ये ५४ टक्क्यांनी घट झाली.
16 / 17
तर विमाक्षेत्रात नवनियुक्त्या ५५ टक्क्यांनी घटल्या.
17 / 17
कोलकाता - ६८ टक्के, दिल्ली एनसीआर - ६७ टक्के, मुंबई - ६७ टक्के, चेन्नई - ६३ टक्के, हैदराबाद - ६३ टक्के, पुणे- ६३ टक्के, बंगळुरू - ५८ टक्के.
टॅग्स :jobनोकरीIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाEmployeeकर्मचारी