पॅन, KCC, GST आणि FD संबंधित 'ही' सात कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करा, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 13:02 IST2021-03-08T12:43:06+5:302021-03-08T13:02:51+5:30
complete these tasks till 31 march 2021 know about it in details : नवीन आर्थिक वर्षात काही बदल होणार आहेत, त्याबद्दल तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळे 31 मार्चपूर्वी तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
नवीन आर्थिक वर्षात काही बदल होणार आहेत, त्याबद्दल तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. पीएनबी, पीएम किसान आणि इतर योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या कामांबद्दल माहिती पुढील प्रमाणे...
1. 'विवाद से विश्वास' योजनेची मर्यादा 31 मार्च
केंद्र सरकारने 'विवाद से विश्वास' योजनेंतर्गत पेमेंट करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली होती. या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रलंबित करांचे निराकरण करीत आहे. योजनेंतर्गत करदात्यांना केवळ विवादित कराची रक्कम द्यावी लागेल आणि त्यांना व्याज आणि दंडावर संपूर्ण सूट मिळेल. दरम्यान, केंद्र सरकारने कर संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी 'विवाद से विश्वास' ही योजना आणली आहे.
2) PNB च्या ग्राहकांसाठी अलर्ट
पीएनबीमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरण झाल्यानंतर ग्राहकांचे जुने आयएफएससी कोड 31 मार्चपासून काम करणार नाहीत. याचबरोबरच, ओबीसी, युनायटेड बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेकबुक देखील 31 मार्च 2021 पर्यंतच वैध असेल, असेही बँकेने म्हटले आहे. 1 एप्रिलपासून ग्राहकांना नवीन चेकबुक वापरावे लागणार आहे.
3. किसान क्रेडिट कार्डसाठी (KCC) अर्ज करण्याची संधी
केंद्र सरकार केसीसीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि डिजिटलायझेशन पुढे नेण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मोहीम राबवून किसान क्रेडिट कार्ड तयार आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधू शकता. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अवघ्या 15 दिवसात किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
4. स्वस्त गृहकर्ज घेण्याचा फायदा
देशातील अनेक सरकारी आणि खासगी बँका 31 मार्च 2021 पर्यंत ग्राहकांना स्वस्त गृहकर्ज देत आहेत. कोटक महिंद्रा बँकेत 31 मार्च 2021 पर्यंत गृह कर्जाचा व्याज दर 6.65 टक्क्यांपासून सुरू होत आहे. या व्यतिरिक्त एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे.
5. FD वर ज्येष्ठ नागरिकांना मिळेल अतिरिक्त व्याज
काही निवडलेल्या मॅच्युरिटी कालावधी योजनांसाठी बँक ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज देत आहे. ग्राहकांना 0.50 टक्क्यांपर्यंत जास्तीचे व्याज मिळेल. या ऑफरची अंतिम मुदत सध्या 31 मार्च 2021 आहे. दरम्यान, एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना ही सुविधा देत आहे.
6. GST रिटर्न फायलिंग
सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे तुम्ही ते 31 मार्चपूर्वी पूर्ण करू शकता.
7. आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करणे
आधार कार्ड हे पॅन कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. तुम्ही 31 तारखेपर्यंत पॅन कार्डला लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय (इनऑपरेटिव्ह) होईल.