ऑफिसला या नाहीतर, कंपनीही सोडू शकता; गुगलचा 'वर्क फ्रॉम होम'बद्दल कठोर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:17 IST2025-06-11T19:11:57+5:302025-06-11T19:17:04+5:30
Google Work From Office Policy: गुगलने वर्क फ्रॉम ऑफिस धोरणाची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली आहे. गुगलने कर्मचाऱ्यांना ऑफिसला यायचं नसेल, तर नोकरी सोडण्याचा पर्यायही दिला आहे.

कार्यपद्धतीमुळे चर्चिला जाणाऱ्या गुगलने आता धोरणात बदल केला आहे. वर्क फ्रॉम होमबद्दल कंपनीने कठोर भूमिका घेतली आहे. कंपनीने काही विभागातील कर्मचाऱ्यांना ऑफिसला येण्यास सांगितले आहे.
गुगलने नवीन वर्क फ्रॉम ऑफिस धोरण लागू केले आहे. अतिमहत्त्वाचा विभाग, मार्केटिंग, संशोधन, ज्ञान आणि माहिती (यात गुगल सर्च, वाणिज्य आणि जाहिरात विभागातील कर्मचारी) आणि संवाद या विभागातील कर्मचाऱ्यांना कंपनीने ऑफिसला येण्यास सांगितले आहे.
कंपनीने हे धोरण अमेरिकेतली कार्यालयांसाठी लागू केले आहे. जे कर्मचारी घरून काम करतात. पण, ते गुगल कार्यालयापासून 80 किमी अंतराच्या आत राहतात. त्यांनी कार्यालयात येण्यास सुरूवात करावी असे सांगितले.
या कर्मचाऱ्यांसाठी हायब्रीड धोरण असणार आहे. म्हणजे आठवड्यातून तीन दिवस ऑफिसला येणं त्याच्यासाठी सक्तीचे करण्यात आले आहे. कंपनीने स्वेच्छा निवृत्ती घेण्यासाठी इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनाही पर्याय उपलब्ध करू दिला आहे. याचा कंपनीला उद्दिष्टांवर लक्ष्य केंद्रीत करण्यास मदत होईल, असे गुगलचे म्हणणे आहे.
गुगलने हायब्रीड वर्क पॉलिसी २०२२ मध्ये आणली होती. नवीन उद्दिष्टे गाठण्यासाठी कंपनीने हे धोरणात आणखी विस्तार केला आहे. गुगलने २०२३ या वर्षात जगभरातील १२ हजार कर्मचाऱ्यांना डच्चू दिला होता.