Vi-Airtel-Jioचे स्वस्त प्लॅन्स! कमी किमतीत हाय-स्पीड डेटासह मिळतील बरेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:12 PM2022-02-04T16:12:18+5:302022-02-04T16:17:39+5:30

जाणून घ्या Vi, Airtel आणि Jio च्या 56 दिवसांची वैधता असलेल्या प्लॅन्सबद्दल.

आजच्या काळात क्वचितच असा कोणी असेल जो स्मार्टफोन वापरत नाही. तुम्हीही स्मार्टफोन वापरत असाल तर, तुम्हाला कोणत्यातरी टेलिकॉम कंपनीच्या प्लॅन्सची आवश्यकता असतेच. आज आम्ही तुम्हाला देशातील आघाडीच्या खाजगी दूरसंचार कंपन्या, Vodafone Idea or (Vi), Airtel आणि Jio च्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. 56 दिवसांची वैधता असलेले हे सर्व प्लॅन केवळ स्वस्तच नाहीत तर यूझर्सला यात अनेक फायदेही मिळतात.

Vodafone-Idea चे प्लॅन्स- Vi चा 539 रुपयांचा प्लॅन: कंपनीच्या 539 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 56 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS असे फायदे मिळतात. याशिवाय, तुम्हाला वीकेंड डेटा रोलओव्हर, बिन्ज ऑल नाईट, 2GB प्रति महिना बॅकअप डेटा आणि Vi Movies & TV अॅपचा अॅक्सेस मिळतो.

Vi चा Rs 699 प्लॅन: Vi च्या या 56-दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 3GB इंटरनेट मिळेल. यामध्ये, तुम्हाला वीकेंड डेटा रोलओव्हर, बिन्ज ऑल नाईट, 2GB प्रति महिना बॅकअप डेटा आणि Vi Movies & TV अॅपचा अॅक्सेस मिळतो.

एअरटेलचे प्लॅनन्स- एअरटेलचा 479 रुपयांचा प्लॅन: एअरटेलचा हा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. 479 रुपयांमध्ये, तुम्हाला दररोज 100 SMS आणि 1.5GB डेटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचे फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये, तुम्हाला Amazon Prime Video च्या मोबाइल एडीशनचे एका महिन्याचे ट्रायल, Wink Music, Shaw Academy आणि Hello Tunesमिळतात. याशिवाय, तीन महिन्यांसाठी Apollo 24/7 सर्कलमध्ये प्रवेश आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळतो.

एअरटेलचा 549 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 2GB इंटरनेट मिळतो. या प्लॅनमध्ये, तुम्हाला Amazon Prime Video च्या मोबाइल एडीशनचे एका महिन्याचे ट्रायल, Wink Music, Shaw Academy आणि Hello Tunes , तसेच तीन महिन्यांसाठी Apollo 24/7 सर्कलमध्ये प्रवेश आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळतो.

जिओचे प्लॅन्स- Jio चा 479 रुपयांचा प्लॅन: कंपनीच्या 479 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 56 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS असे फायदे मिळतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला Jio Cloud, Jio Cinema आणि Jio TV सारख्या सर्व Jio अॅप्सचे अॅक्सेस मिळते.

जिओचा 533 रुपयांचा प्लॅन: 56 दिवसांच्या वैधतेच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 2GB इंटरनेट आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला Jio Cloud, Jio Cinema आणि Jio TV सारख्या सर्व Jio अॅप्सचे अॅक्सेस मिळते.