शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काही मिनिटांत बदला तुमच्या बँक खात्याचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक; 'या' आहेत तीन सोप्या पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 4:04 PM

1 / 12
आपल्याकडे कोणत्याही बँकेत खाते असल्यास आणि आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर बदलू इच्छित असल्यास आपण काही मिनिटांत हे काम पूर्ण करू शकता. आता ग्राहकांना बँकेची पायरी न चढता हे काम करता येणार आहे.
2 / 12
तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी तुम्हाला केवळ तुमचं डेबिट कार्ड आणि आधीपासूनच रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल क्रमांकाची गरज पडणार आहे. जाणून घेऊया कसा बदलता येईल तुम्हाला मोबाईल क्रमांक.
3 / 12
जर तुम्ही नेट बँकिंगची सुविधा घेतली असेल तर तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कंम्प्युटरच्या मदतीनं आपल्या बँकेत रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक बदलू शकता.
4 / 12
आपण स्टेट बँकेचं उदाहरण समजून घेऊ. जर तुम्ही स्टेट बँकेची नेट बँकिंग सुविधा घेतली असेल तर तुम्हाला सर्वप्रथम www.onlinesbi.com या वेबसाईटवर लॉग इन करावं लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा.
5 / 12
त्यानंतर तुमच्या पर्सनल डिटेल्सवर क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलचा पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि जुना मोबाईल क्रमांक दिसेल.
6 / 12
यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलण्याचाही पर्याय दिसेल. यामध्ये दिलेल्या सूचनांचं पालन करून तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलता येणार आहे.
7 / 12
जर तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करत नसाल तर तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक बदलून घ्यावा लागेल. त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी एक फॉर्म उपलब्ध असतो.
8 / 12
तुम्हाला देण्यात आलेला फॉर्म भरून त्याच्यासोबत तुम्हाला तुमचं पासबुक आणि आधार कार्डाची फोटोकॉपी द्यावी लागेल. त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलला जाईल.
9 / 12
याशिवाय तुम्हाला एटीएमद्वारेही मोबाईल क्रमांक बदलण्याची सुविधा देण्यात येते. परंतु त्यासाठी तुमच्याकडे जुना मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे, जो बँकेकडे यापूर्वीपासून रजिस्टर आहे.
10 / 12
जर तुमच्याकडे यापूर्वी रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक नसेल तर तुम्हाला तुमचा नवा मोबाईल क्रमांक एटीएमद्वारे बदलता येणार नाही.
11 / 12
एटीएमद्वारे मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एटीएम कार्ड टाकून पिन एन्टर करावा लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या मोबाईल क्रमांक बदलण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल.
12 / 12
त्यानंतर तुमच्या जुन्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल, तो तुम्हाला एटीएममध्ये एन्टर कावा लागेल. त्यानंतर तुमच्याकडून पुन्हा नंबर मागितला जाईल त्याची तुम्हाला पुष्टी करावी लागेल. त्यानंतर एटीएमद्वारे तुमचा मोबाईल क्रमांक बदलला जाईल.
टॅग्स :MobileमोबाइलbankबँकMONEYपैसाState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाSmartphoneस्मार्टफोनatmएटीएम