Business Idea: सुपरहिट बिझनेस! फक्त २ लाखांची गुंतवणूक करा आणि दर महिना १० लाख कमवा; Amul फ्रेंचायझी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 04:13 PM2022-12-14T16:13:21+5:302022-12-14T16:24:57+5:30

दिग्गज Amul कंपनीसोबत तुम्हीही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. पण कसे? या सुवर्ण संधीबाबतचे जाणून घ्या...

अनेकांची स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची मोठी इच्छा असते. मात्र, भांडवल आणि गुंतवणूक यांमुळे अनेक जण अन्य पर्यायांचा विचार करतात. जर तुम्हीही बिझनेस करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला छोट्या गुंतवणुकीत दरमहा मोठी कमाई करायची असेल तर, एक उत्तम संधी तुमच्याकडे आहे. (Business Idea)

अलीकडेच आलेल्या कोरोना महामारीत अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापारांवर गदा आली. परंतु, कोरोना कालावधीतही जी क्षेत्रे अविरत सुरू होती, त्यातील एक प्रमुख क्षेत्र म्हणजे डेअरी आणि डेअरी प्रोडक्ट्स. कोरोना संकट काळातही दुधाचा व्यवसाय अखंडपणे सुरूच होता. डेअरी क्षेत्रातील एक मोठे आणि आघाडीचे नाव म्हणजे Amul.

आम्ही तुमच्यासाठी अशी एक बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्ही छोट्या गुंतवणुकीत प्रचंड नफा कमवू शकता. तुम्हाला Amul या प्रसिद्ध डेअरी उत्पादने कंपनीसोबत व्यवसाय करण्याची उत्तम संधी आहे. अमूलची फ्रेंचायझी तुम्हाला दर महिन्याला बंपर कमाई करू शकते. अमूलची फ्रेंचायझी घेणे खूप सोपे आहे.

Amul सोबत व्यवसाय करणे सोपे आहे. खरे तर यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे अमूलचा ग्राहकवर्ग आणि दुसरे म्हणजे ते शहरातील कोणत्याही ठिकाणी अमूलचा स्टॉल खुला केला जाऊ शकतो. अमूलचा प्रत्येक शहरात चांगला ग्राहकवर्ग आहे. प्रत्येक शहरातील लोक त्याची उत्पादने नावाने ओळखतात.

मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही Amul पोहोचले आहे. म्हणूनच अमूलची फ्रेंचायझी घेतल्यास तोटा होण्याची शक्यता कमी आहे. Amul आपला व्यवसाय वाढवण्यासाठी दोन प्रकारच्या फ्रेंचायझी ऑफर करते. अधिक माहितीसाठी Amul ची वेबसाइट पाहू शकता.

तुम्हाला Amul आउटलेट, Amul रेल्वे पार्लर किंवा Amul कियोस्कची फ्रेंचायझी घ्यायची असेल तर तुम्हाला त्यात सुमारे २ लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये नॉन-रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून २५ हजार रुपये, नूतनीकरणासाठी १ लाख रुपये, उपकरणांसाठी ७५ हजार रुपये खर्च केले जातात.

तुम्हाला Amul आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर चालवायचे असेल आणि त्याच्या फ्रेंचायझीची योजना बनवायची असेल, तर तुम्हाला यामध्ये थोडी अधिक गुंतवणूक करावी लागेल. ते मिळवण्यासाठी तुम्हाला सुमारे ५ लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्हाला ब्रँड सिक्युरिटी म्हणून ५० हजार रुपये, नूतनीकरणासाठी ४ लाख रुपये, उपकरणे १.५० लाख रुपये खर्च करावे लागतील.

तुम्ही Amul आउटलेटची फ्रेंचायझी घ्यायची असेल तर तुमच्याकडे फक्त १५० स्क्वेअर फूट जागा असावी. तुमच्याकडे पुरेशी जागा असल्यास, अमूल तुम्हाला फ्रँचायझी देईल. मात्र, अमूल आइस्क्रीम पार्लरच्या फ्रेंचायझीसाठी किमान ३०० चौरस फूट जागा असावी. तुमच्याकडे एवढी जागा नसेल तर अमूल फ्रेंचायझी देणार नाही.

Amul फ्रेंचायझीने दिलेल्या माहितीनुसार, फ्रेंचायझीच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे ५ ते १० लाख रुपयांची विक्री होऊ शकते. अमूल आउटलेट घेतल्यावर, कंपनी अमूल उत्पादनांच्या किमान विक्री किंमतीवर (MRP) कमिशन देते.

Amul यामध्ये दुधाच्या पाऊचवर २.५ टक्के, दुग्धजन्य पदार्थांवर १० टक्के आणि आईस्क्रीमवर २० टक्के कमिशन मिळते. Amul आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायझी घेतल्यावर, तुम्हाला रेसिपीवर आधारित आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर ५० टक्के कमिशन मिळते.

Amul कंपनी प्री-पॅक केलेल्या आइस्क्रीमवर २० टक्के कमिशन आणि अमूल उत्पादनांवर १० टक्के कमिशन देते. अमूल कोणत्याही प्रकारची रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रँचायझी ऑफर करीत असल्याचे बोलले जाते.

Amul कडून तुम्हाला कंपनीची ओळख दिली जाईल. सर्व साहित्य आणि ब्रँडिगवर सबसिडी मिळेल. त्याशिवाय सुरुवात करण्यासाठी विशेष मदत केली जाईल. जास्त माल खरेदी केल्यावर डिस्काऊंट मिळेल. ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर दिल्या जातील.

याशिवाय मालक किंवा कर्मचाऱ्याला ट्रेनिंग दिले जाईल. तुमच्यापर्यंत उत्पादने पोहोचवण्याची जबाबदारी Amulची असेल. अमूलकडून प्रत्येक मोठी शहरे, जिल्ह्याच्या ठिकाणांवर होलसेल डीलर्स नियुक्त केले आहेत. हे डीलर्स तुमच्यापर्यंत उत्पादने पोहोचवतील.

सर्व तपशील डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी अमूलच्या वेबसाईटला भेट द्यावी, असे सांगितले जाते. (टीप - या लेखात केवळ गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)