Go Air आता झाली Go First; जाणून घ्या काय आहे या Rebranding मागचं कारण

Published: May 14, 2021 12:58 PM2021-05-14T12:58:39+5:302021-05-14T13:03:49+5:30

Go Air : सध्या कोरोनाच्या महासाथीचा फटका हवाई क्षेत्रालाही बसला आहे. याचा परिणाम गो एअरवरही झाला आहे.

सध्या कोरोनाच्या महासाथीचा फटका हवाई क्षेत्रालाही बसला आहे. याचा परिणाम गो एअरवरही झाला आहे.

वाडिया समुहाची (Wadia Group) लो कॉस्ट एअरलाईन्स गो एअरनं (Go Air) स्वत:ला गो फर्स्ट (Go First) या रूपात रिब्रँड केलं आहे.

१५ वर्षे जुन्या असलेल्या या विमान कंपनीनं अल्ट्रा लो कॉस्ट व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रिब्रँड करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या कोरोनाच्या महासाथीचा विमान कंपन्यांवर मोठा परिणाम झाला आहे. याचा परिणाम गो एअरवरही झाला आहे.

यातूनच बाहेर येण्यासाठी कंपनी आता लो कॉस्ट बिझनेस मॉडेलवर लक्ष केंद्रित करणार आहे.

या दरम्यान कंपनीनं आपल्या महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याच्या योजेनेसाठी निधी जमा करण्यासाठी एक इनिशिअल शेअर सेलची तयारी केल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.

अल्ट्रा-लो-कॉस्टच्या (ULCC) रूपात Go First आपल्या ताफ्यात सिंगल एअरक्राफ्टप्रमाणे संचालन करेल.

ज्यात सध्या एअरबस A320 आणि A320Neos (नव्या इंजिन पर्याय) दोन्ही विमानांच्या संचानात आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे.

सध्या एव्हिएशन मार्केटमध्ये Go Air चा गिस्सा ७.८ टक्के इतका होता.

पहिल्यांदा जून २०१४ मध्ये या विमान कंपनीचा एव्हिएशन मार्केटमध्ये हिस्सा १० टक्क्यांच्या पुढे गेला होता.

काही बाबी सोडल्यान तर गेल्या वर्षी कोरोनाची महासाथ येईपर्यंत हा हिस्सा १० टक्क्यांच्या जवळपासच होता.

नव्या धोरणानुसार कंपनी ULCC मॉडेलवर फोकस करेल. तसंच नव्या ब्रँड अंतर्गत कंपनी आपल्या परिचालनांमध्ये बदल करणार आहे.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका विमान कंपन्यांना बसला आहे. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागत आहे.

गेल्या १५ महिने हे विमान क्षेत्रासाठी अतिशय कठीण होते. इतकंच नाही तर वेळही अयोग्य होती, गो फर्स्ट आता पुढे येणाऱ्या संधींकडे पाहत आहे, असं गो फर्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौशिक कोहना म्हणाले.

हे रिब्रँडिंग कंपनीचं उज्ज्वल भविष्य दर्शवतं. गो फर्स्ट टीम ब्रँड डिलिव्हर करण्यासाठी आणि ‘You Come First’ ला प्रत्यक्षात साकारण्याचे प्रयत्न करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!