२४ तासांत फुटला बुडबुडा...! तब्बल ८५००० रुपयांनी आपटली चांदी, सोनंही धडाम! चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:12 IST2026-01-30T18:05:51+5:302026-01-30T18:12:45+5:30

चांदी नुकतीच ४.२ लाख तर सोने २ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. मात्र या धक्कादायक घसरणीने बाजारात खळबळ उडाली आहे.

जागतिक आणि स्थानिक बाजारांतही सोन्या-चांदीच्या दरात शुक्रवारी जबरदस्त घसरण दिसून आली. चांदीचा भाव अवघ्या २४ तासांतच विक्रमी पातळीवरून तब्बल ८५००० रुपयांनी घसरला. तर सोन्याच्या दरातही मोठी घसरण दिसून आली आहे.

चांदी नुकतीच ४.२ लाख तर सोने २ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. मात्र या धक्कादायक घसरणीने बाजारात खळबळ उडाली आहे.

एमसीएक्सवर (MCX) गुरुवारी चांदीने ४२००४८ रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र यानंतर, शुक्रवारी ३.३० वाजता मार्च वायदा व्यवहारात चांदी ६५,००० रुपयांनी घसरून ३,३५,००१ रुपयांवर आली. अर्थात 24 तासांचा विचार करता, चांदी जवळपास ८५,००० रुपयांनी घसरली आहे.

सोन्याचा विचार तरता, गुरुवारी सोने १,९३,०९६ रुपयांवर पोहोचले होते, जे आता २५,५०० रुपयांच्या घसरणीसह १,६७,४०६ रुपयांवर आले आहे.

घसरणीचं कारण काय? तज्ज्ञांच्या मते, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीनंतर गुंतवणूकदारांनी आपली नफावसुली (Profit Booking) सुरू केल्याने ही घसरण दिसत आहे. तसेच, शॉर्ट सेलर सक्रिय झाल्यामुळे दरांवर परिणाम झाला.

या घसरणीचा थेट परिणाम गोल्ड आणि सिल्वर ईटीएफवर (ETF) झाला असून, त्यांचे दर २० टक्क्यांपर्यंत तुटले आहेत. आयसीआयसीआय सिल्वर ईटीएफ २०.१४%, निप्पॉन इंडिया सिल्वर १८.५९%, तर टाटा गोल्ड ईटीएफ ९.१६ टक्क्यांनी घसरले.