Jio, Airtel, Vi विसरा! BSNL ने आणलेत १३, १८ रुपयांचे दमदार प्लान; ९० जीबीपर्यंत डेटा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:03 PM2022-02-04T20:03:12+5:302022-02-04T20:06:47+5:30

BSNL कडे स्वस्त आणि परवडणाऱ्या प्रीपेड प्लानची मोठी यादी असून, ग्राहकांना कमी किमतीत अनेक फायदे देतात. पाहा, डिटेल्स...

अलीकडील काळात सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यंतरी रिचार्जच्या किमती वाढवण्यात आल्या असल्या, तरी कंपन्या कमी किमतीचे प्लान सादर करून युझर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्थिक संकटात अडलेली असली तरी सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक भन्नाट प्लान सादर करत आहेत. केवळ १३, १८ आणि २९ रुपयांचे दमदार प्लान आणले असून, यामध्ये उपयुक्त ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

BSNL च्या या प्लानमुळे Jio, Airtel, Vi यांसारख्या मातब्बर कंपन्यांना जोरदार टक्कर मिळेल, असे बोलले जात आहे. बीएसएनएल १८ रुपयांच्या प्लानमध्ये २ दिवसांची वैधता देतेय. म्हणजेच दिवसाचा खर्च केवळ ९ रुपये होईल. यामध्ये युझरला अनलिमिटेड कॉलिंग, व्हिडिओ कॉल आणि दररोज १ जीबी डेटा ऑफर करण्यात येत आहे.

दुसरीकडे BSNL च्या १३ रुपयांच्या प्लानमध्ये २ जीबी डेटा मिळू शकेल. हा प्लान केवळ एका दिवसासाठी वैधता मिळेल. तर, २९ रुपयांच्या प्लानमध्ये ५ दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड कॉलिंग, व्हिडिओ कॉल आणि एकूण १ जीबी डेटा ऑफर केला जात आहे.

BSNL १९८ रुपयांमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसाठी १ GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह दररोज १०० SMS ऑफर करते. अधिक कॉलिंग करणाऱ्यांसाठी या प्लानमध्ये मोफत व्हॉईस कॉलची सुविधा देण्यात आली आहे.

BSNL२९८ रुपयांचा प्लान ग्राहकांना ५६ दिवस वैधता प्रदान करतो. तसेच, १०० SMS/दिवसासह २९८ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा प्लान प्रतिदिन १ GB डेटा देखील देते आणि EROS Now वर ५६ दिवसांसाठी प्रवेश देखील प्रदान करतो.

BSNL चा ३०० रुपयांच्या खाली असलेला आणखी एक प्लान २९९ रुपयांचा आहे. हा पॅक ग्राहकांना ३० दिवसांसाठी दररोज १०० एसएमएससह मोफत कॉलिंगची सुविधा देतो. तसेच, यात रोज ३ GB डेटाचा लाभ देखील ग्राहकांना घेता येतो.

BSNL आपल्या कमी बजेटच्या ग्राहकांसाठी अतिशय स्वस्त प्लान्स देखील ऑफर करते. BSNL चा सर्वात कमी किमतीचा प्लान ४९ रुपये आहे. डेटाबद्दल बोलायचे झाल्यास या ४९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण २ GB डेटा ग्राहकांना मिळतो.

BSNL चा ९९ रुपयांचा पॅक २२ दिवसांच्या वैधतेसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉल ऑफर करतो. BSNL कडे Voice_१३५ पॅक देखील आहे. जो, १३५ रुपयांमध्ये २४ दिवसांच्या वैधतेसाठी १४४० मिनिटे व्हॉइस कॉल ऑफर करतो.