शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Flight, समुद्रात जहाजांमधूनही करू शकाल कॉल आणि इंटरनेटचा वापर; BSNL ला मिळाला 'हा' लायसन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 11:55 AM

1 / 11
लवकरच तुम्ही विनामात आणि जहाजांमध्ये प्रवासादरम्यान आपल्या मोबाईल फोनवरून बोलू शकाल आणि इंटरनेटचाही वापर करू शकणार आहात.
2 / 11
जागतिक मोबाईल सॅटेलाईट क्षेत्रात काम करणारी प्रमुख कंपनी Inmersat नं सांगितलं की रणनितीक भागीदार बीएसएनएलनं (BSNL) भारतात ग्लोबल एक्स्प्रेस (GX) मोबाईल ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी आवश्यक तो लायसन्स मिळवला आहे.
3 / 11
जागतिक मोबाईल सॅटेलाईट क्षेत्रात काम करणारी प्रमुख कंपनी Inmersat नं सांगितलं की रणनितीक भागीदार बीएसएनएलनं (BSNL) भारतात ग्लोबल एक्स्प्रेस (GX) मोबाईल ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी आवश्यक तो लायसन्स मिळवला आहे.
4 / 11
यामुळे भारतीय देशांतर्गत विमान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या देशभरात उड्डाणादरम्यान उच्च-स्पीड कनेक्टिव्हिटी (Hi Speed Connectivity) प्रदान करण्यास सक्षम असतील.
5 / 11
Inmersat एका निवेदनात म्हटलं आहे की दूरसंचार विभागाकडून भारत संचार निगम लिमिटेडला उड्डाण आणि सागरी कनेक्टिव्हिटीसाठी (आयएफएमसी) दिलेला परवाना ग्लोबल एक्सप्रेसची सुविधा सरकारी, विमान परिचालन आणि सागरी क्षेत्रात भारतीय ग्राहकांना उपलब्ध करून देण्यास सक्षम करेल.
6 / 11
ही घोषणा महत्त्वाची आहे. कारण याचा अर्थ असा आहे की भारतीय विमान कंपन्या देश आणि परदेशात उड्डाण दरम्यान कनेक्टिव्हिटीसाठी GX चा वापरण्यास सक्षम असतील.
7 / 11
तसेच, हिंद महासागर क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील व्यावसायिक कंपन्या त्यांच्या जहाजांच्या उत्तम संचालन आणि चालक दलाशी निगडीत सेवांसाठी आपल्या जहाजांच्या डिजिटायझेशन वाढवण्यासाठी सक्षम असतील.
8 / 11
उड्डाणादरम्यान प्रवाशआंना संपर्क साधण्याची सुविधा देणाऱ्या ग्लोबल एक्स्प्रेसच्या सुविधा आता भारतातही येत आहेत यासाठी आम्ही खुश आहोत अशी प्रतिक्रिया स्पाईसजेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी दिली.
9 / 11
GX K बँडमध्ये काम करतो. हे एक हाय स्पीड ब्रॉडबँड नेटवर्क आहे. जगात कुठेही प्रवासादरम्यान अधिक चांगली कनेक्टिव्हिटी देण्याच्या उद्देशाने हे डिझाइन केलं गेलं आहे. ही सेवा उच्च बँडविड्थ, विश्वसनीयता आणि सुरक्षा देते. हे व्यावसायिक आणि सरकारी स्तरावरील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करते.
10 / 11
आज INMARSAT आणि भारतासोबत आमच्या मौल्यवान आणि दीर्घकालीन भागीदारीमध्ये एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. भारत १९७९ मध्ये INMARSAT च्या स्थापनेशी निगडीत करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांमध्ये सामील आहे, अशी प्रतिक्रिया INMARSAT चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सुरी यांनी सांगितलं.
11 / 11
ग्लोबल एक्स्प्रेसला सरकार आणि 'मोबिलिटी' व्यवसाय ग्राहकांसाठी जगातील सर्वोत्तम हाय स्पीड उपग्रह संप्रेषण सेवा म्हणून मान्यता आहे. ही क्षमता भारतातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी.के. पुरवार यांनी दिली.
टॅग्स :BSNLबीएसएनएलInternetइंटरनेटIndiaभारत