म्युच्युअल फंडाची जबरदस्त योजना; रातोरात वाढणार संपत्ती, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 10:31 AM2020-07-22T10:31:44+5:302020-07-22T10:45:56+5:30

म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बऱ्याचदा शेअर बाजारावर अवलंबून असते. पण म्युच्युअल फंडामध्येही अशीही एक योजना आहे, जी आपल्याला मोठा फायदा करून देत आहे.

कोरोनाच्या संकटात अख्खा देश भरडून निघाला आहे. कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे मरणपंथाला आले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात लोकांचा गुंतवणुकीचा ओघही आटला आहे. बऱ्याचदा अशा परिस्थितीत लोक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत नाहीत.

सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनाही सध्या काळात तोटा सहन करावा लागतो आहे. म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बऱ्याचदा शेअर बाजारावर अवलंबून असते. पण म्युच्युअल फंडामध्येही अशीही एक योजना आहे, जी आपल्याला मोठा फायदा करून देत आहे.

ओव्हरनाइट फंडा (Overnight Mutual Funds)बद्दल आपण बोलत आहोत. ही कर्ज म्युच्युअल फंडाची एक श्रेणी आहे. ही एक खुली योजना असून, त्यात कोणताही लॉक-इन पीरियड नाही. ही योजना एका दिवसांत परिपक्व होणाऱ्या परिपक्व सिक्युरिटीमध्ये पैसे गुंतवते. याचा अर्थ असा की, या योजनांमधील फंड व्यवस्थापक(Fund Managers) दररोज सिक्योरिटी खरेदी करतात.

या सिक्युरिटीज(Securities) एका दिवसात परिपक्व बनतात. त्यानंतर या योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून पुन्हा नवीन सिक्युरिटी खरेदी केली जाते. अशा गुंतवणुकीच्या मार्गदर्शकतत्त्वांमुळे ते खूपच लिक्विड बनतात. सेबीने सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडासाठी गुंतवणुकीची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत.

ओव्हरनाइट फंड्स (Overnight Mutual Funds)मध्ये जोखीम फारच कमी असते. ही योजना अशा गुंतवणूकदारांसाठी आहे, ज्यांना अल्प कालावधीत भरपूर पैसा गुंतवायचा आहे.

कंपन्या अशा योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. कारण अल्पावधीच्या मोठ्या रकमेतील गुंतवणुकीत चांगला परिणाम होतो. पण छोट्या गुंतवणूकदारांना ओव्हरनाइट फंड्स (Overnight Mutual Funds)मध्ये जास्तीचे उत्पन्न मिळवणे कठीण आहे.

इतर डेट म्युच्युअल फंडांप्रमाणेच जर ओवरनाइट फंड्स (Overnight Mutual Funds) तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवला गेला असेल तर ते दीर्घ मुदतीच्या भांडवलासह ते करास पात्र असतात. तीन वर्षांपूर्वी गुंतवणूक विक्रीला काढल्यास आपल्याला प्राप्तिकर स्लॅबनुसार कर भरावा लागेल.

सरकारी किंवा मोठ्या कंपन्यांना दिवसासाठी अतिरिक्त रोख आवश्यक असते, म्हणून ते कर्ज घेतात. दुसर्‍या दिवशी त्यांच्याकडे अतिरिक्त रोख असल्यास ते इतर कंपन्यांना कर्ज देतात, अन्यथा ते ओवरनाइट फंडाद्वारे पुन्हा कर्ज घेतात.

कर्ज म्युच्युअल फंडाच्या श्रेणीत ओवरनाइट फंड हा सर्वात सुरक्षित असल्याचे म्हटले जाते. कारण असे आहे की, त्यामधील गुंतवणुकीचा दृष्टिकोन खूपच छोटा असतो. व्याजदरात बदल आणि या योजनांवरील कोणत्याही सुरक्षेच्या बाबतीत काहीही फरक पडत नाही.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या काळात सुरक्षित परतावा मिळवणार्‍यांसाठी ओवरनाइट फंड्स (Overnight Mutual Funds) हा एक चांगला पर्याय असू शकतो, जेथे मॅच्युरिटी फक्त 1 दिवसाची असते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या योजनेंतर्गत 100% रक्कम कोलॅटरलाइज्ड बॉरोइंग आणि लँडिंग ऑब्लिगेशन (CBLO)कडून बाजारात गुंतविली जाते, ज्यामुळे जोखीम कमी होते.

CBLO इन्स्ट्रुमेंटमधील मॅच्युरिटी 1 दिवसाची असू शकते. तरलतेचीही समस्या नाही. 1 दिवसाच्या मॅच्युरिटीमुळे परतावा कमी मिळाला असला तरी, तो खूपच सुरक्षित आहे. या कारणास्तव अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्यांना फारच कमी जोखीम घेऊन थोडे अधिक परताव्यासाठी पैसे गुंतवायचे आहेत त्यांच्यासाठी या योजना योग्य आहेत.