Banking Tips: चेक पेमेंट करताना 'या' गोष्टींची नक्की घ्या काळजी, नाहीतर बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 03:30 PM2023-04-12T15:30:46+5:302023-04-12T15:38:46+5:30

आजच्या या ऑनलाइन पेमेंटच्या काळात अजूनही मोठ्या रकमेचे बहुतांश व्यवहार चेकनेच केले जातात.

Banking Tips while making Cheque Payment: सध्या आपला भारत देश पूर्णपणे डिजिटल होण्याच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करतोय. त्यामुळेच हल्ली कॅश पेमेंट किंवा चेक ने पेमेंट करणे या गोष्टी खूप कमी झाल्या आहेत. लोक बहुतांश वेळा ऑनलाइन पेमेंटचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत. असे असले तरी काही मोठ्या रकमेचे किंवा जोखमीचे व्यवहार हे अजूनही चेक पेमेंटच्या माध्यमातूनच केले जातात.

चेक लिहिणे ही जरी अगदी साधी सोपी गोष्ट असली तरी त्यात अनेकदा छोट्याशा चुका होतात आणि त्याचा चांगलाच फटका आपल्याला बसू शकतो. अशा वेळी चेक लिहिताना किंवा चेक पेमेंट करत असताना नक्की कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, याबद्दल आज आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया.

चेक काळजीपूर्वक भरा- चेक भरताना झालेल्या छोटाशा चुकीमुळे तुमचा चेक बाऊन्स होऊ शकतो. अशावेळी गुंतवणूक करण्यापूर्वी चेक अतिशय काळजीपूर्वक भरायला हवा.

चेक बाऊन्ससाठी दंड आणि तुरुंगवास- जर तुमचा चेक बाऊन्स झाला, तर बँक तुमच्याकडून आर्थिक दंड कापून घेऊ शकते. तसेच, काही परिस्थितींमध्ये ही चूक तुम्हाला थेट तुरुंगातही जाण्यास भाग पाडू शकते.

बँक बॅलन्स ठेवणे आवश्यक- तुम्ही जितक्या रकमेचा चेक लिहून देत आहात, तितकी रक्कम तुमच्या बँक खात्यात असणे अत्यंत आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर तुमच्या खात्यातील किमान रक्कम (Minimum Balance) आणि तुमच्या चेकवरील रक्कम यांचेही नीट गणित जुळवणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला या चुकीसाठी मोठा दंड भरावा लागू शकतो.

150 ते 800 रुपये दंड- तुम्ही लिहिलेला चेक बाऊन्स झाल्या, तर तुम्हाला १५० ते ८०० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. परिस्थितीचे गांभीर्य आणि इतर काही गोष्टींचा विचार करता, काही वेळा या दंडाची रक्कम किंवा त्यापेक्षा जास्तदेखील असू शकतो. बँकेच्या नियमानुसार हा दंड बसू शकतो. त्यामुळे चेक लिहिताना अतिशय काळजी घ्या.