शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नियम बदलले! फक्त ७ रुपये गुंतवून मिळवा ६० हजारांची पेन्शन; २.२८ कोटी लोकांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 9:17 AM

1 / 14
मोदी सरकारच्या अटल पेन्शन योजनेतल्या नियमांत बदल केले आहेत. या योजनेत दररोज 7 रुपये वाचवून गुंतवणूक केल्यास वय वर्ष 60 नंतर प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये (वर्षाला 60 हजार रुपये) पेन्शन प्राप्त होते.
2 / 14
केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला असून, या पेन्शन योजनेत आता वर्षात कधीही पेन्शन योगदानाची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकतो. हा नियम १ जुलैपासून लागू झाला आहे.
3 / 14
योजनेचा सर्वसामान्यांना लाभ घेता यावा, असं उद्दिष्ट ठेवूनच 1 जुलैपासून नवे नियम अंमलात आले आहेत. पूर्वी सदस्यांना केवळ एप्रिलमध्येच योगदानाची रक्कम बदलण्याची मुभा देण्यात आली होती.
4 / 14
पीएफआरडीएच्या मते, सदस्य आर्थिक वर्षात फक्त एकदाच पेन्शन योजना बदलू शकत होते. पण आता त्या नियमात बदल करण्यात आला आहे. अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सुमारे २.२८ कोटी भागधारक नोंदणी केलेली आहे.
5 / 14
पीएफआरडीएने असेही म्हटले आहे की, एपीवाय योगदानाची रक्कम संबंधित भागधारकांच्या बचत खात्यातून १ जुलै, २०२० पासून आपोआप वजा करण्यास सुरुवात झाली आहे.
6 / 14
कोरोनाच्या संकटापायी योगदानाची रक्कम जमा करण्यावर 30 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली होती. सध्याच्या काळात एपीवाय योगदान जर एप्रिल ते ऑगस्ट 2020 दरम्यान प्रलंबित असेल तर ते 30 सप्टेंबरपर्यंत आपोआप भागधारकांच्या बचत खात्यातून वजा केले जाईल. त्या रकमेवर कोणत्याची दंडाची रक्कम किंवा कोणतेही व्याज देय होणार नाही.
7 / 14
अटल पेन्शन योजना मे 2015मध्ये सुरू केली गेली. ही योजना 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान देशातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे.
8 / 14
या योजनेंतर्गत निवृत्तीवेतनधारकांना पेन्शनची हमी देण्यात येते जेव्हा ते 60 वर्षांचे होतात तेव्हा दरमहा 1 हजार ते 5000 रुपयांपर्यंत निवृत्तीवेतन मिळते. हे त्यांच्याकडून दिलेल्या रकमेवर अवलंबून असते.
9 / 14
हे खाते शासकीय, खासगी किंवा ग्रामीण बँकांमध्ये देखील उघडता येते. याशिवाय पेमेंट बँका ही खातीही उघडतात.
10 / 14
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी (एनएसडीएल)च्या वेबसाइटनुसार 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक या योजनेत सामील होऊ शकतात. केवळ त्या लोकांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल, जेव्हा त्यांना पेन्शन मिळेल.
11 / 14
अटल पेन्शन योजनेअंतर्गत केवळ जीवितच नाही, तर मृत्यूनंतरही कुटुंबाला मदत मिळत राहते. जर या योजनेशी संबंधित एखाद्या व्यक्तीचा 60 वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर त्याची पत्नी या योजनेत पैसे जमा करणे आणि 60 वर्षांनंतर दरमहा पेन्शन मिळवू शकते.
12 / 14
दुसरा पर्याय असा आहे की, त्या व्यक्तीची पत्नी तिच्या पतीच्या निधनानंतर एकाकी रक्कम मागू शकते. जर पत्नीचेही निधन झाले तर तिच्या नामनिर्देशित व्यक्तीला एकरकमी रक्कम दिली जाते. ही रक्कम प्राप्तिकराच्या बाहेर असते.
13 / 14
एपीवायमधील पेन्शनची रक्कम आपल्या गुंतवणुकीवर आणि आपल्या वयावर अवलंबून असते. अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत (एपीवाय) किमान मासिक पेन्शन किमान १,००० रुपये आणि जास्तीत जास्त ५००० रुपये मिळू शकतात. वयाच्या 60 व्या वर्षांपासून तुम्हाला एपीवाय अंतर्गत पेन्शन मिळू लागेल.
14 / 14
जे लोक आयकर अंतर्गत येतात, ते सरकारी कर्मचारी आहेत किंवा आधीच ईपीएफ, ईपीएस सारख्या योजनांचा लाभ घेत आहेत, ते अटल पेन्शन योजनेचा भाग होऊ शकत नाहीत. (एपीवाय) अटल पेन्शन योजना (एपीवाय) बद्दल अधिक माहितीसाठी आपण या वेबसाइटला भेट देऊ शकता.
टॅग्स :government schemeसरकारी योजनाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी